पराभव मान्य करणं हे आमच्यावर संस्कार, आता विरोधकांनी रडीचा डाव…; पराभवानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

पराभव मान्य करणं हे आमच्यावर संस्कार, आता विरोधकांनी रडीचा डाव…; पराभवानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

Pankaja Munde : बीड लोकसभा (Beed Lok Sabha) मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी 6 हजार मतांनी त्यांचा पराभव केला. बीडमधील पराभव हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जातो आहे. दरम्यान, या पराभवनानंतर आता पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली.

पुनीत बालन यांचा पुढाकार; नवनिर्वाचित खासदार मोहोळांचा केला जंगी सत्कार 

आज माध्यमांशी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, कालचा निकाल अनपेक्षितच होता. कारण मी विजयाची तयारी केली होती. पण, मला पराभवाचं शल्य नाही. कारण माझ्याकडे कुठलंही पद नव्हतं. देशातील अनेक दिग्गजांकडे मंत्रीपदं होते, ते पराभूत झाल्यानं त्यांना शल्य वाटेल. मी तर फार कमी मतांनी पराभूत झाले. मला ज्या मतदारांनी मतदान केले, त्यांची मी ऋणी आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

निवडणुकीत सुमार कामगिरीमुळेच फडणवीचांचे राजीनाम्याचे नाटक; कॉंग्रेसचे टीकास्त्र 

पुढं बोलतांना त्या म्हणाल्या की, कार्यकर्त्यांच्या विनंतीनंतर मी फेरमतमोजणीची मागणी केली होती. पण ती मान्य झाली. यामुळं कार्यकर्ते नाराज आहेत. पण मला माझा पराभव मान्य आहे. पराभवही सन्मानाने स्वीकारला पाहिजे, अशी शिकवण आम्हाला मुंडे साहेबांनी दिल्याचं पंकजा म्हणाल्या. जवळपास पंधराशे पोस्टल मत मोजली नाहीच नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

या निकालाचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल का, असं विचारलं असतं पंकजा मुंडे म्हणाल्या की, या निकालाचा परिणाम विधानसभेवर नक्कीच होणार आहे. हे नाकारता येणार नाही. आता विरोधकांनी रडीचा डाव खेळू नये. कारण, जे पक्ष फुटले, त्यांचे लोकसभेत जास्त खासदार निवडून आले. विरोधकांचा आत्मविश्वास वाढला. समोरच्या बाजूला अनुभवी ऩेते आहे. त्यांना जास्त जागा मिळाल्यात. लोकसभेच्या विजयाने त्यांचा आत्मविश्वास वाढला. याच आत्मविश्वासाने ते आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे पक्ष आणि महायुती म्हणून आम्ही जास्त मेहनत केली पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज