मी घाबरलो अन् फ्लॅटमध्ये प्रवेश…, डॉ. गौरी प्रकरणात नव वळण? अनंत गर्जेंचा मोठा खुलासा

Anant Garje : राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सचिव अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी यांनी वरळी येथे राहत्या घरी गळाफास घेत

  • Written By: Published:
Anant Garje

Anant Garje : राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सचिव अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी यांनी वरळी येथे राहत्या घरी गळाफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री 7 च्या दरम्यान डॉ. गौरी यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. यानंतर डॉ.गौरी यांच्या कुटुंबियांकडून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे आता या प्रकरणात मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे स्वीय सचिव अनंत गर्जे (Anant Garje) यांची देखील प्रतिक्रिया समोर आल्याने या प्रकरणाला नवीन वळण मिळत आहे. अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यावरुन गर्जे दाम्पत्यांमध्ये वाद, भांडण सुरु होती असा आरोप देखील करण्यात येत आहे. यावर आता अनंत गर्जे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले अनंत गर्जे ?

डॉ. गौरी यांच्या कुटुंबियांकडून लावण्यात आलेल्या आरोप अनंत गर्जे यांनी फेटाळून लावत घटनेच्या वेळी घरी नव्हतो असं त्यांनी सांगितले आहे. अनंत गर्जे म्हणाले की, घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो. घरी परतलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते. कितीही आवाज दिला तरी प्रतिसाद मिळत नव्हता त्यामुळे मी घाबरलो आणि धाडस करुन 31 व्या मजल्यावरुन 30 व्या मजल्यावरील आमच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला. घरात दाखल झालो तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्या क्षणी मी पूर्णत: हादरलो असा दावा अनंत गर्जे यांनी केला. गौरीला खाली उतरवून मी तातडीने रुग्णालयात नेलं असं देखील अनंत गर्जे म्हणाले.

तर दुसरीकडे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला आहे. तसेच मृत्यदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आतापर्यंत कुटुंबियांचे जबाब नोंदवून, मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्डसारखे पुरावे तपासात घेत आहे.

श्रेयवादाचा आरोप सिद्ध करा राजकारण सोडतो, सत्यजीत तांबेंचे खताळांना आव्हान

डॉ. गौरी यांच्या कुटुंबीयांचे आरोप काय?

डॉ. गौरी आत्महत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियाने केलेल्या दाव्यानुसार, डॉ. गौरी यांनी अनंत गर्जे यांच्या विवाहबाह्य संबंधांचे काही पुरावे वडिलांना पाठवले आहे. त्यामुळे या प्रकरणात चौकशी आत्महत्या प्रकरणात बघून नाहीतर हत्या समजून करण्यात यावी अशी मागणी डॉ. गौरी यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.

follow us