Pankaja Munde PA Anant Garje : पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीची आत्महत्या, मुंबईत जीवन संपवलं

Pankaja Munde PA Anant Garje : राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक

  • Written By: Published:
Pankaja Munde PA Anant Garje

Pankaja Munde PA Anant Garje : राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वरळीतील राहत्या घरी अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी गळाफास घेत आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

अनंत गर्जे (Anant Garje) आणि डॉक्टर गौरी पालवे (Gauri Palve) यांचा 7 फ्रब्रुवाारी रोजी लग्न झाला होता. डॉक्टर गौरीने राहत्या घरी शनिवार 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता घरात गळाफास घेऊन आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे.

या प्रकरणात वरळी पोलिसांनी (Worli Police) अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये दोघांचा लग्न झालं होतं. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला असून शवविच्छेदनाची रिपोर्ट आल्यानंतर सत्य बाहेर येईल असे सांगितले जात आहे.

तर दुसरीकडे या धक्कादायक घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची देखील माहिती समोर आली आहे. तर डॉक्टर गौरी यांचा सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात येत होता असा आरोप गौरी यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

कोपरगावकरांचा आशुतोष काळेंना प्रतिसाद; 3 तारखेला गुलाल उडवणार; रुपाली चाकणकर

तसेच अनंत गर्जे यांचे अफेअर असल्याची माहिती डॉक्टर गौरी यांनी मिळाल्यानंतर डॉक्टर गौरी अस्वस्थ झाल्या होत्या असं देखील कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे.

follow us