परळीत धनंजय मुंडे अन् पंकाजा मुंडेंची हवा, नगर परिषदेचे दोन सदस्य बिनविरोध विजयी
अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे आता उमेदवारांचं चित्र स्पष्ट होत आहे. राज्यात अनेक काही ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतले जात आहेत.
महाराष्ट्रात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. (Beed) धनंजय मुंडेनी विजयाचा गुलाल उधळला आहे. परळी नगर परिषद निवडणुकीत महायुतीचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. हा विजय धनंजय मुंडे यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे आता उमेदवारांचं चित्र स्पष्ट होत आहे. राज्यात अनेक काही ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतले जात आहेत. यामुळे अनेक उमेदवारांनी निवडणुकााधीच विजयी गुलाल उधळला आहे. बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषद निवडणुकीत महायुतीचे दोन उमेदवार विजयी झाले आहे. अजित पवार गट आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.
बीडमधली परळी नगरपरिषद निवडणुक चुरशीची होईल असे चित्र होते. अशातच आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांचे नशिबच पालटले. परळीत महायुतीचे दोन उमेदवार विजयी झाले आहे, नगरसेवकपदाचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
कुणाचा मुलगा तर कुणाची बायको, कुठं कुणाची भाची तर कुठ मेव्हणा; वाचा बिनविरोध लढाया
बीडच्या परळीनगर परिषदेत महायुतीच्या बाजूने पहिलाच निकाल हाती आला आहे. नगरसेवक पदासाठी शिंदे गटाचा एक उमेदवार आणि अजित पवार गटाचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यामुळे निवडणूक होण्यापूर्वीच महायुतीच्या दोन नगरसेवक विजयी झाले आहेत.
नगरपरिषद निवडणुकीतील बिड जिल्ह्यातील महायुतीच्या नगरसेवकपदाच्या उमेदवाराचा हा पहिलाच विजयी निकाल आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रभाग क्रमांक 13 मधील रेश्मा बळवंत या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक 11 मधील जयश्री गीते या शिंदे शिवसेना गटाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार बिनविरोध विजयी घोषीत झाल्या आहेत.
