पिंपरी चिंचवडसाठी दादांनी कंबर कसली; पक्षप्रवेशासाठी राष्ट्रवादीकडून राहुल कलाटेंना संपर्क

Rahul Kalate पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला भाजपकडून खेचून आपल्याकडे आणण्यासाठी स्वतः अजित पवार पक्ष प्रवेश आणि नियोजनात लक्ष घालून आहेत.

  • Written By: Published:
पिंपरी चिंचवडसाठी दादांनी कंबर कसली; राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक राहुल कलाटे यांना संपर्क

NCP Contact Ex Corporator Rahul Kalate : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला भाजपकडून खेचून आपल्याकडे आणण्यासाठी स्वतः अजित पवार पक्ष प्रवेश आणि नियोजनात लक्ष घालून आहेत. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनाही राष्ट्रवादीकडून पक्षप्रवेशासाठी संपर्क केल्याचे समजते आहे. पिंपरी चिंववड महापालिकेतील माजी नगरसेवक राहुल कलाटे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते असून चिंचवड विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहिले आहेत. त्यापूर्वी त्यांनी महापालिकेत शिवसेनेचे गटनेते म्हणूनही काम केले आहे.

पाच सर्व्हेतील ‘बॅकबेंचर्स’ ना भाजपाचा ‘STRICT NO’; पण, माजी नगरसेवकांचं दादांकडून ग्रँड ‘वेलकम’

आज (१६ डिसेंबर) अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे पिंपरी चिंचवडमधील सर्व प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. सलग दोन दिवस अजित पवारांनी इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटींचा धडाका लावला आहे. तत्पूर्वी प्रमोद कुटे, अश्विनी जाधव, रुपाली आल्हाट, सीमा साळवे, नेताजी काशीद यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घेण्यात आले.

निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची घोषणा केली आणि त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. फडणवीसांच्या वक्तव्याला दुजोरा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट केले. तेव्हापासून सलग दोन दिवस अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये इच्छुकांचे प्रवेश आणि मुलाखतींचा धडाका लावला आहे. NCP Contact Ex Corporator Rahul Kalate

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लढविण्यासाठी सर्वाधिक इच्छुक भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहेत. दोन्ही पक्षांनी महायुती म्हणून निवडणूक एकत्र न लढण्याचा निर्णय केला त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र लढण्याची चर्चाही शहरात सुरू आहे.

अजित पवारांचा ‘एकला चलो’चा मोठा डाव; पुण्यात वेगळ लढण्याच्या निर्णयाने काय होणार?

अजित पवारांनी संपर्क केला याबद्दल राहुल कलाटे यांना प्रश्न विचारल्यावर कलाटे म्हणाले, “प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. मी गेली अनेक वर्ष राजकीय जीवनात सक्रिय आहे. मी अपक्ष लढलो तरी जनतेने दरवेळी माझ्यावर मतांचे दान माझ्या पदरात दिले. त्यांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी, वाकड – पुनावळे – ताथवडेच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी सातत्याने संघर्ष करतो आहे. माझ्याशी कोणी संपर्क केला यापेक्षा महत्वाचे आहे, जनतेच्या अपेक्षांना न्याय देणे. जनतेचा विश्वास सार्थ ठरवणे महत्वाचे आहे. जनतेला न्याय देणारा निर्णय मी योग्यवेळी जाहीर करेन असे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी म्हटले आहे.

follow us