कुणाचा मुलगा तर कुणाची बायको, कुठं कुणाची भाची तर कुठ मेव्हणा; वाचा बिनविरोध लढाया
रायगडच्या पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे 3 उमेदवार तर राष्ट्रवादी पक्षाचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
राज्यात सध्या नगर परिषद आणि नगर पालिकांच्या निवडणुकांच वार सुरू आहे. (Election) अर्ज भरू आज अर्ज माघे घेण्याची अखेरची तारीख होती. आज अखेरच्या दिवशी अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने अनेक ठिकाणचं चित्र स्पष्ट झालं आहे. काही ठिकाणी लढण्याआधी उमेदवारांची बिनविरोध विजय झाला आहे. विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते गुलाल उधळत आनंद साजरा करताना दिसत आहेत. राज्यातील कोणत्या ठिकाणी किती उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रायगडच्या पेण नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे 3 उमेदवार तर राष्ट्रवादी पक्षाचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विजयी उमेदवारांमध्ये प्रभाग क्र. 11 अ मालती तुकाराम म्हात्रें (भाजप), प्रभाग क्रमांक 11 (ब)स्मिता दयान पेणकर (भाजप), प्रभाग क्रमांक 12 अभिराज रमेश कडू(भाजप) तर प्रभाग क्रमांक 12 सुशीला हरिच्छंद्र ठाकूर (राष्ट्रवादी अजित पवार),प्रभाग क्रमांक 9 वसुधा तुकाराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार), प्रभाग क्रमांक 5 दीपक जयवंत गुरव(राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे.
शिरूर नगरपरिषदेत अभूतपूर्व स्थिती; भाजप, लोकशाही आघाडीनंतर धारीवालांचीही माघार
परळी नगर परिषदेत शिंदे गटाचा एक उमेदवार आणि अजित पवार गटाचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रभाग क्रमांक 13 मधील उमेदवार रेश्मा बळवंत या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदे शिवसेना गटाच्या जयश्री गीते बिनविरोध विजयी झाल्या आहेत.
बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 8 नगरसेवक आज बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्याने हे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. बारामतीतील नटराज कलादालन येथे निवडून आलेल्या नगरसेवकांचे किरण गुजर यांनी स्वागत केलं.
शिर्डी नगरपरिषदेत अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपच्या उमेदवार मनिषा शिवाजी गोंदकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईने भाजपच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने छाया पोपट शिंदे विजयी झाल्या आहेत.
धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिकेत इतिहास घडला आहे. येथे नगराध्यक्षसह भाजपच्या 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. अर्ज माघारीच्या दिवशी भाजप विरोधातल्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे.
रायगड मधील पेण नगरपालिका निवडणूकीत छाननी दरम्यान उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने नगरसेवक पदाचे एकूण 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 12 ब मधून भाजपचे अभिराज कडू तर 12 अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुशीला हरिचंद्र ठाकूर या ही बिनविरोध विजयी झाल्या आहेत.
चिखलदरा नगरपरिषदेत नगरसेवक पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधकांनी सामूहिक निर्णय घेत फॉर्म मागे घेतले त्यामुळे कलोती हे बिनविरोध निवडून आले आहेत.
राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा, शिंदे गट असे चारही पक्ष मैदानात आहेत. मात्र शिंदे गटाच्या अतुल देशमुख यांनी मोठा डाव टाकत राजगुरुनगर नगरपरिषदेत सुप्रिया पिंगळे यांना बिनविरोध विजयी केले आहे.
जळगावच्या जामनेर येथील नगरपालिकेत भाजपचे 10 नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपदी यापूर्वीच भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून जामनेर नगरपालिकेवर भाजपच्या सत्ता असून यावर्षी देखील विरोधकांनी माघार घेतल्याने भाजपचे नगराध्यक्ष बिनविरोध झाले होते.
