प्रीतम मुंडेंना शह देण्यासाठी भाजपची खेळी? सुरेश कुटे बीड लोकसभा लढविणार असल्याची चर्चा
बीड : बीडच्या कुटे उद्योग समुहाचे प्रमुख सुरेश कुटे (Suresh Kute) आणि त्यांच्या पत्नी, कुटे उद्योग समुहाच्या व्यवस्थापक अर्चना कुटे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपासून कुटे दाम्पत्य भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर काल (12 नोव्हेंबर) दिवाळीचा मुहूर्त साधून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रेवश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढणार असल्याचे बोलले जाते. (Will Suresh Kutte be BJP’s candidate from Beed for the upcoming Lok Sabha)
याशिवाय आगामी लोकसभेला प्रीतम मुंडे यांना शह देण्यासाठी सुरेश कुटे हे रिंगणात असू शकतात, अशा चर्चा सध्या बीडच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. कुटे उद्योग समूहाने फार कमी कालावधीत उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. तिरुमला हा तेलाच्या क्षेत्रातील अग्रगण्य ब्रॅंड कुटे ग्रुपने तयार केला आहे. कापड दुकानांपासून ते 19 कंपन्यांचा 17 हजार कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या कुटे ग्रुपने 25 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला.
MLA Disqualification : आमदार अपात्र होणार? नार्वेकरांच्या उत्तराने वाढला ‘सस्पेन्स’
या सगळ्यामुळे सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांची बीडच्या वर्तुळात चांगली प्रतिमा आहे. त्यांच्या या प्रतिमेचा चांगला फायदा आगामी निवडणुकीत होऊ शकतो. तसेच पंकजा मुंडे यांना पर्यायही उभा करता येऊ शकतो, असे राजकीय जाणकार सांगतात. या सर्व चर्चांवर अर्चना कुटे यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्या दोघांपैकी कोणीही कोणतीही निवडणूक लढवणार नसून फक्त सामाजिक कार्यकर्त्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
Lok Sabha Election : ‘एक दिवस पंतप्रधानपदी विराजमान होऊ’; भाजपाच्या जुन्या मित्राचं चॅलेंजिंग वक्तव्य
अर्चना कुटे म्हणाल्या, आमच्या दोघांपैकी कोणीही कोणतीही निवडणूक लढवणार नसून फक्त सामाजिक कार्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी कुटे समुहाच्या माध्यमातून आपण अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले आहेत. हेच काम पुढे नियमितपणे सुरु ठेवण्यासाठी मला भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सारख्या नेत्यांच्या आशीर्वादाची गरज होती, त्यामुळेच आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.