300 कोटींचा वाद अन् सासऱ्याची सुनियोजित हत्या, नागपूर हिट अँड रन प्रकरणात मोठं ट्विस्ट

300 कोटींचा वाद अन् सासऱ्याची सुनियोजित हत्या, नागपूर हिट अँड रन प्रकरणात मोठं ट्विस्ट

Nagpur Hit And Run Case : नागपुरात झालेल्या हिट अँड रन प्रकरणात (Nagpur Hit And Run) एक मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. एका कार अपघातात 22 मे रोजी 82 वर्षीय पुरुषोत्तम पु्ट्टेवार (Purushottam Puttewar) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना (Police) एक धक्कादायक माहिती मिळाली आहे.

माहितीनुसार, हा प्रकरण अपघाताचा नसून हत्येचा आहे. संपत्तीच्या कारणावरून ही हत्या करण्यात आली आहे. 82 वर्षीय पुरुषोत्तम पु्ट्टेवार यांची सून अर्चना पुट्टेवारने (Archana Puttewar) 82 वर्षीय सासर्‍यांच्या हत्येची सुपारी कुटुंबातील ड्रायव्हर सार्थक बागडेचे माध्यमातून दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ड्रायव्हर सार्थक बागडेने नीरज नीमजे (Neeraj Nimje) आणि सचिन धार्मिक (Sachin Dharma) या दोघांना पुरुषोत्तम पु्ट्टेवार यांच्या अपघातातून हत्येची सुपारी दिली होती.

पोलिसांनी या प्रकरणात सून अर्चना पुट्टेवार, ड्रायव्हर सार्थक बागडे, नीरज नीमजे आणि सचिन धार्मिक या चारही आरोपींना अटक केली आहे. आरोपी सार्थक बागडे फरार झाला होता मात्र त्याला देखील पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय

22 मे रोजी शहरातील अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बालाजी नगर परिसरात 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांना भरधाव कारने धडक दिली होती यामध्ये पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सुरुवातील अजनी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचीच नोंद करण्यात आली होती मात्र त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला होता.

पोलिसांना या तपासात सुनियोजित पद्धतीने हा अपघात घडवून आणल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत नीरज निमजे आणि सचिन धार्मिक या आरोपींना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम पु्ट्टेवार यांना धडक देणाऱ्या कारमध्ये हे दोघे स्वार होते आणि त्यांना सार्थक बागडेने अपघातातून हत्या करण्याचं काम दिलं होतं अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेली कार खरेदीसाठी अर्चना पुट्टेवार यांनी पैसे दिल्याची माहिती देखील नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांनी दिल्याने नागपूर पोलिसांनी अर्चना पुट्टेवार यांना अटक केली.

पाकिस्तानचं काय होणार? आज कॅनडाशी भिडणार; जाणून घ्या सर्व समीकरण

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम पु्ट्टेवार यांच्याकडे 300 कोटींची संपत्ती होती त्यामध्ये अर्चना पुट्टेवारला भाग न मिळाल्याने त्यांनी 82 वर्षीय पुरुषोत्तम पु्ट्टेवार यांच्या हत्येची सुपारी दिली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube