दोन आमदारांचा नकार, गडकरींविरोधात काँग्रेसला उमेदवारच नाही; नागपुरातील ‘गणित’ अवघड

दोन आमदारांचा नकार, गडकरींविरोधात काँग्रेसला उमेदवारच नाही; नागपुरातील ‘गणित’ अवघड

Nagpur News : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली (Nagpur News) यादी जाहीर केली. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं नाव नव्हतं. त्यामुळे यंदा नितीन गडकरींना तिकीट मिळणार का? भाजपने त्यांच्यासाठी काय नक्की केलं आहे? अशा अनेक चर्चा सुरू झाल्या. आता भाजप लवकरच दुसरी यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं असतील अशी शक्यता आहे. या यादीत गडकरी यांचं नाव असेल याचं उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. भाजपमध्ये अशी परिस्थिती असताना दुसरीकडे काँग्रेसचीही मोठी पंचाईत झाली आहे.

गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी उमेदवारच सापडत नसल्याने बिकट परिस्थिती काँग्रेस नेतृत्वासमोर उभी राहिली आहे. या निवडणुकीत गडकरी यांच्याविरोधात ज्या दोन उमेदवारांचा विचार पक्षाने केला होता त्या दोन्ही उमेदवारांनी निवडणूक लढण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे आता कोण उमेदवार द्यायचा असा मोठा प्रश्न काँग्रेस नेतृत्वासमोर उभा राहिला आहे.

Nitin Gadkari : तीन दिवसांत माफी मागा नाही तर.. नितीन गडकरी काँग्रेस नेत्यांवर का चिडले?

नितीन गडकरी यांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसला उमेदवार मिळत नाही का याची चर्चा आता होत आहे. कारण गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढण्यास काँग्रेसचे उमेदवार इच्छुक नसल्याची माहिती समोर येत आहे. आमदार विकास ठाकरे आणि आमदार अभिजीत वंजारी या दोघांनीही गडकरी यांच्याविरोधात लढण्यास नकार दिला आहे.

नितीन गडकरी यांच्याविरोधात तितक्यातच ताकदीचा उमेदवार उभा करायचा असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी काँग्रेसकडून चाचपणी केली जात आहे. यासाठी विधानपरिषदेचे आमदार अभिजीत वंजारी यांचं नाव समोर आलं होतं. त्यांनीच निवडणूक लढवावी यासाठी काँग्रेसही आग्रही होती. परंतु, ऐनवेळी वंजारी यांनी नकार दिला. विधानपरिषदेच्या आमदारकीची तीन वर्षे अजून शिल्लक आहेत. येथून पुढे निवडणुकीला सामोरे जाणे योग्य होणार नाही, असे कारण त्यांनी पक्ष नेतृत्वाला दिले.

Lok Sabha 2024 : उत्तरेत भाजप, दक्षिणेत विरोधक स्ट्राँग; ‘दक्षिण दिग्विजय’ भाजपसाठी यंदाही कठीणच

यानंतर पक्षाने आमदार विकास ठाकरे यांचा विचार सुरू केला. त्यांची चाचपणीही करण्यात आली. परंतु, पश्चिम नागपूरचे आमदार असलेले विकास ठाकरे यांनी देखील मतदारसंघातील व्यस्ततेचे कारण दिले. गडकरी यांना टक्कर देण्याची क्षमता आमदार ठाकरे यांच्यात आहे. शहरात त्यांचं मोठं नेटवर्क आहे. पक्षावर पकड आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ते कुणबी समाजातून येतात अशा परिस्थितीत ठाकरे यांच्या रुपाने दुसरा पर्याय काँग्रेससमोर होता. मात्र त्यांनीही निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाची मोठी अडचण झाली आहे.

तिसऱ्या उमेदवारासाठी काँग्रेसला विरोधाची शक्यता 

दरम्यान, दोन आमदारांनी नकार दिल्यानंतर आता काँग्रेसने प्रफुल गुडधे यांच्या नावाचा विचार सुरू केला आहे. पक्षाने जर संधी दिली तर निश्चितच मी निवडणूक लढायला तयार आहे, असे गुडदे यांनी सांगितले आहे. परंतु, विकास ठाकरे विरुद्ध प्रफुल गुडधे हा संघर्ष नागपुरात राहिलेला आहे. त्यामुळे एक गट गुडधे यांचा नक्कीच विरोध करेल. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की जर पक्षाने तिकीट दिलं तरच मी मैदानात उतरेन नाहीतर पक्ष ज्यांना तिकीट दईल त्या उमेदवाराबरोबर राहू अशी भूमिका गुडधे यांनी घेतली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube