Nitin Gadkari : तीन दिवसांत माफी मागा नाही तर.. नितीन गडकरी काँग्रेस नेत्यांवर का चिडले?

Nitin Gadkari : तीन दिवसांत माफी मागा नाही तर.. नितीन गडकरी काँग्रेस नेत्यांवर का चिडले?

Nitin Gadkari issued notice to Congress Leader : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी (Nitin Gadkari) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांना कायदेशीर (Jayram Ramesh) नोटीस धाडली आहे. गडकरींबद्दल आक्षेपार्ह मजकूर काँग्रेसच्या अधिकृत ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. यानंतर आक्रमक होत गडकरींनी या दोन्ही नोटीस पाठवली आहे. इतकेच नाही तर या प्रकाराबद्दल लेखी माफी मागावी, असेही या नोटीसीत म्हटले आहे.

नितीन गडकरी यांचे वकिल बलेंदू शेखर म्हणाले, की एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीतून 19 सेकंदांची क्लिप काढून टाकल्याचे पाहून भाजप नेते आश्चर्यचकित झाले. या क्लिपमध्ये जे काही बोलले गेले ते त्याचा संदर्भ आणि अर्थ लपून राहिला. नोटीसमध्ये म्हटले आहे की नितीन गडकरींच्या मुलाखतीचा विपर्यास करून नंतर पोस्ट करण्यात आली. या व्हिडिओचा नेमका अर्थ लपवण्यात आला आणि हा व्हिडिओ शेअर करण्यात आला.

…म्हणून Nitin Gadkari यांचं सुप्त आकर्षण वाटत; जयंत पाटलांकडून गडकरींवर स्तुतीसुमनं

नितीन गडकरी म्हणाले, की सगळ्यात आधी हा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकण्यात यावा. तीन दिवसांत लेखी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. ही कायदेशीर नोटीस तुम्हाला त्वरित एक्सवरून काढून टाकण्यास सांगते. नोटीस मिळाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पुढील 24 तासांच्या आत पोस्ट काढून टाकणे आवश्यक आहे. तसेच माझ्या क्लायंटकडून तीन दिवसांत लेखी माफी मागावी.

नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे, की जर असे केले नाही तर माझ्या क्लायंटला तुमच्या जोखमीवर आणि खर्चावर सर्व दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. हा व्हिडिओ फक्त भाजपमध्ये कलह निर्माण करण्यासाठीच शेअर करण्यात आला आहे, असा दावा गडकरी यांच्या वकिलांनी केला आहे.

Gadkari: नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर; ‘गडकरी’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित

काँग्रेसने शेअर केलेला व्हिडिओ नितीन गडकरींच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा आहे. या मुलाखतीचा एक छोटासा भाग पक्षाने एक्सवर शेअर केला होता आणि त्याला हिंदीमध्ये कॅप्शन दिले होते. व्हिडिओ शेअर करताना काँग्रेसने कॅप्शनमध्ये शेतकरी आणि मजूर नाराज असल्याचे वर्णन केले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज