ट्रक ड्रायव्हर्सचा प्रवास होणार ‘गारेगार’: नितीन गडकरींच्या मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

ट्रक ड्रायव्हर्सचा प्रवास होणार ‘गारेगार’: नितीन गडकरींच्या मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : देशातील ट्रकची खराब स्थिती आणि प्रवासादरम्यान ट्रक ड्रायव्हर्सची होणारी दयनीय अवस्था पाहता भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 2025 पासून सर्व ट्रक्समध्ये एसी केबिन अनिवार्य करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक परिपत्रक जारी करुन याबाबतची माहिती दिली. (All N2 and N3 category trucks manufactured after 1 October 2025 will be fitted with air conditioning in the cabin)

प्रवासादरम्यान, ट्रक ड्रायव्हर्सची अवस्था दयनीय होते, उन्हामुळे त्यांना उष्माघाताचा आणि अन्य आजारांचा सामना करावा लागतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून याबाबत अनेक दिवसांपासून उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरु होते. काही दिवसांपूर्वीही ट्रक्समध्ये एसी केबिन होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.अखेर अनेक प्रयत्नांनंतर अखेर सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित केली आहे.

2017 मध्ये राजकीय पदार्पण, 2023 मध्ये मायावतींचा उत्तराधिकारी : कोण आहे आकाश आनंद?

त्यानुसार आता 1 ऑक्टोबर 2025 आणि त्यानंतर उत्पादित होणाऱ्या सर्व N2 आणि N3 श्रेणीतील ट्रकच्या केबिनमध्ये वातानुकूलन यंत्रणा बसवली जाईल. वातानुकूलन यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या केबिनची चाचणी अधिसूचित ऑटोमोटिव्ह मानकांनुसार केली जाणाक आहे.

चर्चेतील नाव गायब, भाजपकडून धक्कातंत्राचा वापर : ‘विष्णू देव साय’ होणार छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

N2 श्रेणी या श्रेणीमध्ये ज्यांचे एकूण वजन 3.5 टनांपेक्षा जास्त आणि 12 टनांपेक्षा कमी आहे अशा अवजड वाहनांचा समावेश होतो. N3 श्रेणीमध्ये एकूण वजन 12 टनांपेक्षा जास्त असलेल्या अवजड वाहनांचा समावेश होतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube