‘यूपी’त ‘इंडिया’ला धक्का! जागावाटपाच्या चर्चा फेल; ‘समाजवादी पार्टी’चा स्वबळाचा नारा?
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या (Lok Sabha Elections 2024) असताना इंडिया आघाडीला आणखी (INDIA Alliance) एक जोरदार धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशात भरपूर (Uttar Pradesh) प्रयत्न केल्यानंतरही इंडिया आघाडी अखेर तुटली आहे. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये (Congress Samajwadi Party Alliance) जागावाटपात एकमत झाले नाही. यानंतर समाजवादी पार्टीने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. तसेही याआधी उमेदवारांची यादी जाहीर करून तसे संकेत पक्षाने दिले होते. आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दोन्ही पक्ष राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात स्वबळावर लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
काँग्रेस आणि समाजवादी पार्टीत मागील बऱ्याच दिवसांपासून धुसफूस सुरू होती. समाजवादी पार्टीकडून दिला जात असलेला प्रस्ताव काँग्रेसला मान्य नव्हता. समाजवादी पार्टीने काँग्रेसला 17 जागांचा प्रस्ताव दिला होता. परंतु, काँग्रेस नेते 20 पेक्षा कमी जागा घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. यासाठी काँग्रेसने सपाला एक यादीही दिल होती.
INDIA Alliance : ‘ममतांशिवाय ‘इंडिया’ आघाडी शक्य नाही’; स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेस बॅकफूटवर!
सूत्रांकडून मिळालेल्या माहितनुसार, सपाकडून दिल्या गेलेल्या जागांमध्ये अमेठी, रायबरेली, वाराणसी, अमरोहा, बागपत, सहारनपूर, गौतमबुद्ध नगर, गाजियाबाद, बुलंदशहर, फतेहपूर सिक्री, हाथरस, झाशी, बाराबंकी, कानपूर, सीतापूर, कैसरगंज आणि महाराजगंज या मतदारसंघांचा समावेश होता. परंतु, काही असे मतदारसंघ होते ज्यावरून दोन्ही पक्षांत वादही सुरू होते.
याआधी समाजवादी पार्टीने काँग्रेसला झटका देत थेट उमेदवारांची यादीच जाहीर केली होती. यात सपाने अशा काही मतदारसंघात उमेदावार जाहीर केले जिथे काँग्रेसचा आक्षेप होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी अत्यंत कठोर शब्दांत समाजवादी पार्टीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती.
आम्ही प्रत्येक मतदारसंघात लढण्यासाठी तयार आहोत, असे अजय राय म्हणाले होते. यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार शाब्दिक वाद सुरू झाले होते. हा वाद इतका वाढला की काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना यात हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले जात असले तरी दोन्ही पक्षांकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Congress : PM मोदींचं कौतुक अन् काँग्रेस विरोधात वक्तव्य; मोठ्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी
जागावाटपावर अखिलेश यादव यांनी स्पष्ट भूमिका घेतली असली तरी काँग्रेस नेत्यांना अजूनही शक्यता वाटत आहे. काँग्रेस नेत जयराम रमेश म्हणाले, चर्चा अंतिम टप्प्यात आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात सकारात्मक वातावरण आहे. इंडिया आघाडीबरोबर निवडणुकीला सामोरे जावे अशी समाजवादी पार्टीचीही इच्छा आहे. आघाडी मजबूत व्हावी अशी काँग्रेसचीही इच्छा आहे. परंतु, यासाठी थोडा वेळ लागेल.