नागपूर हादरलं ! एसटी चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

नागपूर हादरलं ! एसटी चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक

Nagpur Police : काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची धक्कदायक घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्याच एकच खळबळ उडाली होती. तर आता पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, पहाटे पाचच्या सुमारास एसटी चालकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणात पोलिसांनी उमरखेडचे (Umarkhed) बस चालक संदीप कदम (Sandeep Kadam) याला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कदम हा नागपूर बसडेपोत चालक म्हणून कार्यरत आहे. पिडित 17 वर्षीय मुलगी आरोपीच्या ओळखीची असून ती 22 मार्च रोजी नांदेडला (Nanded) जाण्यासाठी उमरखेड बसस्थानकावर बसची वाट पाहत होती. तेव्हा आरोपी तिच्या जवळ आला आणि कुठे जात आहे असं विचारले त्यावर पिडितेने नांदेडला जात आहे असं उत्तर दिले. आरोपीने तिला चल सोडून देतो असं सांगत नांदेला नेले आणि तेथून पिडितेला नागपूरला घेऊन आला आणि रविवारी पहाटे 5 वाजता बस नागपूरला पोहचली. तेव्हा आरोपी संदीपने पिडित मुलीला रुमवर नेले आणि रुममध्ये तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर नागपूर-सोलापूर या बसने तिला उमरखेडला सोडून दिले.

मुलगी घरी आली नाही म्हणून पीडितेच्या कुटुंबीयांनी चौकशी केली असता पीडित मुलगी संदीप कदम याच्यासोबत उमरखेडला दिसल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी संदीप कदम याला उमरखेड बसस्थानकावरुन अटक केली असून त्याच्यावर भादंवि कलम 137 (2) 64 ( 1) 96 भारतीय न्याय संहितासह 4, 8, 12 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाठपुरावा खा.लंकेंचा मात्र चढाओढ महायुतीच्या आमदारांची!

तर दुसरीकडे संदीप कदम याला पोलिसांनी अटक केल्यानंतर एसटी प्रशासनाने याची दखल घेत संदीपला सोमवारी निलंबित करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube