शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाठपुरावा खा.लंकेंचा मात्र चढाओढ महायुतीच्या आमदारांची!

Nilesh Lanke : नगर जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी खासदार नीलेश लंके यांनी संसदेत आवाज उठवून त्यासाठी संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरवा केल्यानंतर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य शासनाने नगर जिल्ह्यातील या महाविद्यालयास जागा पाहण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली.
खा. नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पाठपुराव्यास यश आल्यानंतर हे महाविद्यालय आपल्याच मतदार संघात असावे यासाठी महायुतीचे आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) व डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamte) यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे. पहिल्याच अधिवेशनात नगर जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याकडे संसदेचे लक्ष वेधले होते. लंके यांच्या या मागणीची दखल घेत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार महाविद्यालयासाठी जागा निश्चित करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती गठीत झाल्यानंतर खा. लंके यांच्या पाठपुराव्यास यश आल्याचे मानले जात असतानाच आता हे महाविद्यालय आपल्याच मतदारसंघात असावे अशी चढाओढ सुरू झाली आहे.
यासंदर्भात अकोले मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या महाविद्यालयासाठी साकडे घातले आहे तर मोनिका राजळे यांनी भाजपाच्या सत्कार समारंभात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे पाथर्डी-शेवगांव येथे हे महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात साकडे घातले.
मोठी बातमी! घरे पुन्हा बांधण्याची परवानगी, बुलडोझर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
काय म्हणाल्या मोनिका राजळे ?
काल परवापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची बातमी येत आहे. पाथर्डी-शेवगांव परिसरात या महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध झाली तर जसे प्रवरा, संगमनेर भागात वैद्यकिय महाविद्यालयाचे साम्राज्य उभे राहिले तसे आमच्या भागात रहावे अशी आमची भूमिका आहे. लाडक्या बहिणीची मागणी पालकमंत्री मान्य करतील अशी अपेक्षा मोनिका राजळे यांनी व्यक्त केली.