सावध राहा, पुढील 24 तासात ‘या’ जिल्ह्यात धो धो पाऊस; अलर्ट जारी

Nanded Rain Alert  : राज्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहे. राज्यातील अनेक गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे

  • Written By: Published:
Nanded Rain Alert

Nanded Rain Alert  : राज्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहे. राज्यातील अनेक गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली आहे. तर आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासात नांदेड जिल्ह्यात (Nanded Rain Alert) विजांच्या कडकडटासह पावसाची शक्यता आहे. यामुळे आज नांदेडसाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाणे, पुणे आणि सांगलीमध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

अहिल्यानगरमध्ये शेताच्या बांधावर जाऊन अधिकाऱ्यांकडून पंचनामे

तर दुसरीकडे गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेवगाव तालुक्यातील कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद व तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरटाकळी, दहिगावने, भावीनिमगाव, देवटाकळी, मजलेशहर, बक्तरपूर, भातकुडगाव, भायगाव, हिंगणगावने व रांजणी परिसरात कृषी अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक पंचनामे करत आहेत. शेतात व रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे पंचनामे करताना अडथळे येत असून, अधिकाऱ्यांना बैलगाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

Asia Cup 2025 Trophy : भारताला कधी मिळणार आशिया कप ट्रॉफी? जाणून घ्या आयसीसीचे नियम

अहिल्यानगर जिल्ह्यातील 84 मंडळात अतिवृष्टी; 3 हजार 497 नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे 124 पैकी 84 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या 3 हजार 497 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अनेक ठिकाणी महसूल प्रशासन, स्थानिक नागरिक व शोध-बचाव पथकांच्या मदतीने 60 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली.

follow us