महाराष्ट्रात पावसाचा कहर; मराठवाड्यात नांदेडमध्ये हाहाकार, अनेक गावांचा संपर्क तुटला

महाराष्ट्रात पावसाचा कहर; मराठवाड्यात नांदेडमध्ये हाहाकार, अनेक गावांचा संपर्क तुटला

Maharashtra Rain : राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. विशेषत: मराठवाड्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. (Rain) नांदेड आणि बीड जिल्ह्यात मोठा पाऊस झाला आहे. नांदेड तालुक्यातील सोमेश्वर रहाटी जैतापूर परिसरात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आज पहाटे ढगफुटी झाल्यानं नांदेडकडे जाणारा राहाटी पुलावरुन पाणी वाहत होते. त्यामुळं नांदेड ते सोमेश्वर जैतापूर रहाटी या गावाचा संपर्क तुटला आहे.

या सर्व परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासन योग्य रितीने सर्व परिस्थिती हाताळत आहे. सर्व काही नांदेडमध्ये केलं जात आहे. राज्य सरकार सर्वोतपरी मदत करेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. नांदेडमध्ये मोठा पाऊस झाला आहे. मी तेथील प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वरील धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात सुटल्याने पाणी आलं आहे. बाजूच्या राज्यांसोबत चर्चा सुरु केली आहे. लष्कराला देखील पाचारण केलं आहे.

हा मराठ्यांनी मुंबई सोडून जाण्यासाठीचा डाव; मनोज जरांगे पाटील सरकारविरोधात आक्रमक

प्रशासन योग्य रितीने सर्व हाताळत आहे. सर्व काही नांदेडमध्ये केलं जात आहे. राज्य सरकार जी मदत असेल ती करेल असे मुख्यमंत्री म्हणाले. बीडच्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून दुपारपासून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळं धरणाचे एकूण सहा वक्री दरवाजे उघडण्यात आले आहेत. मांजरा नदीपात्रात 19218.54 क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. कालपासूनच या धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले होते.

आज गेट क्रं 1,3,4,6 हे 1 मीटरने तर गेट 2,5 हे 0.75 मिटरने वर उघडत नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला असल्याने.मांजरा नदी काठावरील नागरिकांना खबरदारीचे आव्हान प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. तसंच, मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. अंधेरी सबवे मध्ये तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सबवे च्या बाहेर पोलिसांनी रस्सी बांधून बंद केली आहे. अंधेरी पूर्व ते पश्चिम ला जाण्यासाठी सध्या पोलिसांकडून गोखले पुलाचा वापर करा असा सूचना केली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube