पाकिस्तानचं काय होणार? आज कॅनडाशी भिडणार; जाणून घ्या सर्व समीकरण

पाकिस्तानचं काय होणार? आज कॅनडाशी भिडणार; जाणून घ्या सर्व समीकरण

PAK vs CAN 2024: आज T20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024) पाकिस्तानचा सामना कॅनडाशी (PAK vs CAN 2024) न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. T20 विश्वचषक 2024 मध्ये आपले आव्हान कायम राखण्यासाठी आजच्या सामन्यात पाकिस्तानला विजय आवश्यक आहे. यामुळे आज पाकिस्तानसाठी खूप महत्वाचा असणार आहे.

T20 विश्वचषक 2024 मध्ये पाकिस्तानला पहिल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते यामुळे आजच्या सामन्यात त्यांच्यासाठी विजय आवश्यक आहे. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात यजमान अमेरिकेकडून (USA) सुपर ओव्हरमध्ये (Super Over) पराभव स्वीकारावा लागला होता तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने (Team India) पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला होता. सलग 2 पराभवानंतर पाकिस्तान अ गटात चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. जर आजच्या सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आलं नाही तर या स्पर्धेत त्यांचे आव्हान संपुष्ठात येईल.

अ गटात भारत आणि अमेरिकेने आपले दोन्ही सामने जिंकले असून दोन्ही संघ 4 गुणांसह टॉप-2 मध्ये आहेत तर 2 पैकी 1 सामना जिंकणारा कॅनडा तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान चौथ्या आणि आयर्लंड पाचव्या स्थानावर आहे.

ताकद दाखवून देणार, पुन्हा खासदार आपलाच होणार, सुजय विखेंकडून मोठी घोषणा

जर आज कॅनडाने पाकिस्तानचा पराभव केला तर त्यांचे 4 गुण होणार.यामुळे पाकिस्तानने शेवटचा सामना जिंकला तरी त्याचे जास्तीत जास्त फक्त 2 गुण होणार आणि पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर पडणार. पाकिस्तानचा शेवटचा गट सामना आयर्लंडशी 16 जून रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे.

Nilesh Lanke : मतदारसंघाचा विकास कसा करणार? खासदार लंकेंनी सांगितला संपूर्ण प्लॅन

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज