ताकद दाखवून देणार, पुन्हा खासदार आपलाच होणार, सुजय विखेंकडून मोठी घोषणा

ताकद दाखवून देणार, पुन्हा खासदार आपलाच होणार, सुजय विखेंकडून मोठी घोषणा

Sujay Vikhe : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) पहिल्यांदाच अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी महायुतीच्या (Mahayuti) सर्व पदाधिकरी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. 2029 मध्ये पुन्हा एकदा महायुतीचा खासदार होणार अशी ग्वाही त्यांनी या मेळाव्यात बोलताना दिली.

यावेळी सुजय विखे म्हणाले, आपला लोकसभा निवडणुकीत थोडक्यात पराभव झाला मात्र त्यामुळे आपण खचून जाणार नाही केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहे. यामुळे आपण लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रत्यन करणार असं सुजय विखे म्हणाले.

तसेच महिन्याभरात नगरच्या औद्योगिक वसाहतीचे पूर्ण होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे उपस्थित होते.

सुजय विखे पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) तयारीला लागावे. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावात आपण निधी दिला आहे. त्या निधीतून विकास कामे पूर्ण कशी होणार याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. आज कोणी काही चर्चा केल्या तरी 2029 मध्ये खासदार पुन्हा महायुतीचाच असेल. कार्यकर्त्यांनी आरोप प्रत्योरोपांमध्ये वेळ घालविण्यापेक्षा आतापासून कामाला सुरूवात करा आणि जिथे अन्याय होईल इथे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा असेल असं देखील सुजय विखे म्हणाले.

कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी रात्रीचा दिवस करून पळाला आहे. निवडणुकीत पराभव का झाला याची कारण फार वेगळी आहे मात्र तरीही आपल्याला सहा लाखांचे मतदान मिळाले आहे. यामुळेच निवडणूक निकालाच्या विश्लेषणात न जाता पुन्हा एकदा नव्याने आपल्याला कामाची सुरुवात करायची आहे. कार्यकर्त्यांनी पराभवामुळे नाराज न होता कामाची सुरुवात करा असेही सुजय विखे म्हणाले.

मतदारसंघाचा विकास कसा करणार? खासदार लंकेंनी सांगितला संपूर्ण प्लॅन

तर विरोधकांवर टीका करताना सुजय विखे म्हणाले, आम्ही पराभव स्वीकारला पण समोरच्यांना विजय पचवता येत नाही. आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून देऊ असं सुजय विखे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज