साखर वाटली, पावसात भिजले तरीही हरले.. सुजय विखेंच्या पराभवाची कारणं काय ?

साखर वाटली, पावसात भिजले तरीही हरले.. सुजय विखेंच्या पराभवाची कारणं काय ?

Ahmednagar Lok Sabha Election : बारामतीप्रमाणेच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचं लक्ष होतं. या निवडणुकीत महायुतीचे सुजय विखे आणि मविआचे निलेश लंके यांच्यात थेट लढत होती. पण, आणखीही एक अदृश्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात होती. या लढतीत लंके विजयी झाले. एका अर्थाने पवारांनी विखेंना मात दिली असे अर्थ आता काढले जाऊ लागले आहेत. त्याचबरोबर सुजय विखेंच्या पराभवाची कारणंही आता शोधली जात आहेत. तगडी यंत्रणा अन् भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचं पाठबळ असतानाही विखे पराभूत झाले तरी कसे, याचा थोडक्यात घेतलेला आढावा.. 

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला व अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये (Ahmednagar Lok Sabha) यंदा प्रस्थापितांना धक्का देणारा निकाल समोर आला. महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना (Sujay Vikhe) या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणुकीपूर्वी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर, डाळ वाटप विखेंनी केली. श्रीगोंद्यातील एका सभेत पावसात भिजत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मतदारसंघामध्ये केलेली विकासकामे असो वा नगर जिल्ह्यासाठी आगामी काळातील व्हिजन सगळं काही भाषणांमधून व्यक्त केलं.

दिग्गज नेत्यांनी सभा घेतल्या मोठे पाठबळ असतानाही अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत सुजय विखे यांना शह देण्यात मविआचे उमेदवार निलेश लंके यांना यश मिळालं. विखे नेमकं कुठे चुकले? कोणते मुद्दे अडचणीचे ठरले? का पराभवाला सामोरे जावे लागलं याचीच काही कारणे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू..

Video : चार वेळा वदवून सांगितलं सोबत राहू; ‘पलटू पंटर’ नितीश कुमारांनी गाजवली NDA ची बैठक

स्वपक्षातील नाराजी भोवली

सुजय विखे यांना 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली. मात्र त्यांच्या उमेदवारीला स्वपक्षातील नेते पदाधिकाऱ्यांकडून विरोध होता. सुरुवातीला लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाजपचे आमदार राम शिंदे व विखे कुटुंबियांमधील वाद देखील सर्वश्रुत आहे. विखे पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नाही. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यामुळे प्रचारसभांमध्ये विखे यांच्या सोबत असलेले नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते हे केवळ सोबत होते मात्र मनाने ते दुरावल्याने याचा फटका देखील विखे यांना निवडणुकीत बसल्याचे समोर आले.

मतदारसंघात जनसंपर्काचा अभाव

2019 च्या निवडणुकीदरम्यान सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला निवडणूक लढले व मोदी लाटेमध्ये निवडून आले. मात्र पहिल्याच निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर विखे यांनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. विखे यांनी मतदारसंघात संपर्क ठेवला नाही अशी नाराजीची भावना नागरिक आजही व्यक्त करतात. यामुळे मतदारसंघातील जनमानसात त्यांच्याविषयी नाराजीचे वातावरण असल्याचे दिसून आले.

‘MP’ मध्ये सुपडा साफ, काँग्रेसमध्ये वाढला वाद; दिग्विजय-कमलनाथ रडावर

दूध अन् कांद्याने केला वांदा

केंद्र सरकारने मागील कार्यकाळात कृषी क्षेत्रात काही निर्णय घेतले होते. हे निर्णय शेतकरी विरोधी आहेत असा आरोप करत त्यास हवा देण्याचे काम विरोधकांनी केले. कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांत सरकारप्रति रोष होता. दुधाच्या दराचा व कांद्याचा प्रश्नावरून विखे यांना अडचणींना तोंड द्यावे लागले. सरकारचा विरोध पर्यायाने सत्तेतील पक्षाच्या खासदाराचा विरोध इथपर्यंत हे लोण आलं. शेतकऱ्यांच्या या रोषाचा फटका विखेंना निवडणुकीत बसला अशी चर्चा आता आहे.

यंत्रणा व अंतर्गत धुसफूस

प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीसाठी विखे यांनी स्वतःची यंत्रणा कार्यरत केली. पक्षातील नेत्यांना विश्वासात घेतलं नाही असा नाराजीचा सूर निवडणूक काळात दिसत होता. तर दुसरीकडे विखे यांना शह देण्यासाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उत्तरेची यंत्रणा लंकेसाठी दक्षिणेत उतरवली. भाजपातील स्थानिकांना डावलण्यात आल्याने भाजप व विखे यांच्या यंत्रणेत धुसफूस देखील पाहायला मिळाली. विखे यांच्या विरोधात पक्षातील वाढलेली नाराजी लंकेंसाठी अनुकूल ठरली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज