Video : चार वेळा वदवून सांगितलं सोबत राहू; ‘पलटू पंटर’ नितीश कुमारांनी गाजवली NDA ची बैठक

देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान होण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा सज्ज झाले आहे. येत्या 9 जून रोजी संध्याकाळी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

  • Written By: Published:
Letsupp Image   2024 06 07T140650.131

नवी दिल्ली : देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा विराजमान होण्यासाठी नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा सज्ज झाले आहे. येत्या 9 जून रोजी संध्याकाळी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी आज (दि.7) नवी दिल्लीत NDA ची बैठक पार पडली. येथे मोदींची एकमताने संसदीय पक्षाचा नेते म्हणून निवड करण्यात आली. यावेळी अजित राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अजित पवार, एकनाथ शिंदेंसह प्रमुख नेत्यांनी समर्थनपर छोटेखानी भाषण दिले. पण चर्चा झाली ती राजकारणातले ‘पलटू राम’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या खास शैलीतील समर्थन भाषणाची. (Nitish Kumar Speech In NDA Meeting Give Assurance About Full Support For NDA Government)

मोदींची एकमताने NDA च्या नेतेपदी निवड; चंद्राबाबू-नितीश यांनी केलं तोंडभरून कौतुक

खास शैलीत मोदींना समर्थन देताना काय म्हणाले नितीश कुमार

NDA संसदीय पक्षाची बैठक आज सकाळी 11 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडली. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपण नेहमीच एकत्र राहू असा शब्द दिला. एवढेच नव्हे तर, भाषण संपल्यानंतर नितीश यांनी मोदींचे पाय धरत त्यांचा आशीर्वादही घेतला.

मोदींचे तोंडभरून कौतुक तर, विरोधकांना घेतले फैलावर

भाषणादरम्यान नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींचे तोडभरून कौतुक केले आणि विरोधकांचा खरपूस समाचार घेत फैलावर घेतले.नितीश म्हणाले की, मोदी गेल्या 10 वर्षांपासून पंतप्रधान आहेत आणि आता पुन्हा ते पंतप्रधान होणार आहेत. गेल्या 10 वर्षात मोदींनी संपूर्ण काळ देशाची सेवा केली. नव्या कार्यकाळात मोदीजी प्रत्येक राज्याचं जी काही काम शिल्लक राहिली आहे ती पूर्ण करतील. आम्ही सर्व दिवस मोदींसोबत राहू. मोदी जे सांगतील तसेच होईल, असेही नितीश कुमार म्हणाले.

Video : एकच खासदार तरीही दिल्लीत अजितदादांचा दबदबा; मिळाला ‘स्पेशल’ मान

आजच शपथ घेऊन टाका

येत्या 9 जून रोजी मोदींचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. मात्र, नितीश कुमार यांना मोदींनी आजच शपथ घ्यावी असे वाटत होते. ही भावाना त्यांना भर कार्यक्रमात भाषणावेळी बोलूनही दाखवली. ते म्हणाले की, माझा आग्रह आहे की, तुम्ही लवकर शपथ घ्या. तुम्ही रविवारी शपथ घेणार आहात. पण माझ्या मते तुम्ही आजच पंतप्रधानपदाची शपथ घेऊन कामाला सुरुवात केली पाहिजे होती. तुमच्या कामामुळे देशाला फायदा होईल. आपण सगळे एकत्र राहू, मोदींचं ऐकून आपण पुढे चालत राहू, असेही नितीश कुमार यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम; गृहमंत्री कोण असणार? दिल्लीत आज खलबत

पुढच्यावेळी सगळे हारलेलं असतील

आम्हाला वाटतं की, तुम्ही पुढच्यावेळी पुन्हा सत्तेत याल, त्यावेळी यंदा जे काही थोडेफार जिंकलेत, ते सगळे हारलेले असतील. विरोधकांनी आजपर्यंत कोणतेही काम केले नाही, देशाची सेवा केली नाही. तुम्ही खूप सेवा केलीत. त्यानंतर आजचा दिवस उगवाल आहे. तुमच्या नेतृत्त्वात बिहारची सर्व कामेही होणार असून, तुम्हाला हवे ते करण्यात आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊ अशा शब्द नितीश यांनी मोदींना दिला.

follow us