Nitish Kumar यांची पहिलीच वेळ नाही; 1974 पासून कधी आरजेडी कधी भाजप तळ्यात-मळ्यात सुरूच

Nitish Kumar यांची पहिलीच वेळ नाही; 1974 पासून कधी आरजेडी कधी भाजप तळ्यात-मळ्यात सुरूच

Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अखेर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपसोबत (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अशा प्रकारे जुनी युती तोडून नवी युती करण्याची नितीश कुमारांची ही काही पहिली वेळ नाही. या अगोदर म्हणजे 1974 पासून आतापर्यंत त्यांनी कित्येकदा अशी प्रकारे बाजू पलटलेली आहे.

…तर मग हे आंदोलन सुरूच राहणार; फडणवीसांच्या वक्तव्यावर जरांगेंचा थेट इशारा

नितीश कुमारांच्या नवनवे मित्र पक्ष बनवण्याचा इतिहास पाहायचा झाला तर, बिहारचं राजकारण हे गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या अवती-भवती फिरणारं राहिलं आहे. 1974 मध्ये बिहार विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1977 मध्ये आरजेटीचे लालूप्रसाद यादव हे पहिल्यांदा खासदार बनले मात्र नितीश कुमार यांना पहिल्यांदा आमदार बनायला 1985 साल उजेडावे लागले. मात्र बिहारचे राजकारणात त्यांची पकड मजबूत आहे.

पहिली ते दहावी मराठी अनिवार्य : राज ठाकरेंची मागणी अन् केसरकरांनी क्षणात घोषणाही केली

असं म्हटलं जातं 1990 मध्ये जेव्हा लालू प्रसाद यादव पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी त्यांना नितेश कुमार यांनी मदत केली होती. मात्र त्यानंतर या दोन्ही नेत्यांमधील संबंध बिघडत गेले. कारण नितीश कुमार यांच्यानुसार लालूप्रसाद यादव यांच्याकडून त्यांची उपेक्षा केली गेली. त्यामुळेच 1994 ला नितीश यांनी पाटणातील गांधी मैदानात ‘कुर्मी अधिकार रॅलीचंट आयोजन केलं आणि त्यानंतर काहीच दिवसात ते जनता दलातून वेगळे झाले. त्याच वर्षी त्यांनी समाजवादी पार्टीचे नेते जॉर्ज फर्नांडिस, ललन सिंह यांच्यासोबत समता पार्टी स्थापन केली.

धक्कादायक! आयटी हब हिंजवडीत इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या; परिसरात खळबळ

1995 च्या निवडणुकीत ते डाव्या पक्षांसोबत निवडणूक लढले. मात्र यात त्यांना खास यश मिळाले नाही. त्यानंतर नितीश यांनी सीपीआय सोबतची युती तोडली आणि 1996 ला भाजपच्या नेतृत्वातील एनडीएचा हात धरला. नितीश यांची भाजपसोबतची ही युती 2010 पर्यंत टिकली. कारण 2010 च्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला मोठं यश मिळालं. याच दरम्यान राजकीय वातावरण चांगलंच बदलत होतं. 2012 मध्ये भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांचे महत्त्व वाढत होतं आणि त्यामुळेच नितेश कुमार यांना एनडीएमध्ये घुसमट जाणवू लागली.

“अधिसुचनेवर लाखो हरकती आल्या तरी..” : ओबीसी नेत्यांना चेकमेट करण्याचा जरांगेंनी सांगितला ‘प्लॅन’

त्यामुळेच 2014 च्या लोकसभा निवडणुका त्यांनी एकट्याने लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र या निवडणुकांच्या निकालानंतर नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. कारण या निवडणुकांमध्ये जेडीयुचा केवळ दोन जागांवर विजय झाला होता. त्यानंतर नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्यासोबत युती केली. यामध्ये ते 2015 च्या लोकसभा निवडणुकीच्या काहीच दिवस अगोदर मुख्यमंत्री झाले आणि विधानसभा निवडणुकांमध्ये या युतीला मोठं यश मिळालं.

पार्थ पवार यांना त्या तीन चुकांची किंमत आजही मोजावी लागतेय…

ही युती देखील फार काळ टिकली नाही. अडीच वर्षांनी म्हणजे 2017 ला नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांना पुन्हा एकदा धक्का दिला. उपमुख्यमंत्री असलेले लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांचं आयआरसीटीसी घोटाळ्यात नाव आलं आणि नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत भाजप सोबत युती करत सरकार स्थापन केलं.

महायुतीचे सरकार येताच गुंडाराज; नगरमध्येही ताबेमारी, गुंडगिरी…; NCP आमदार राऊतांच्या निशाण्यावर

त्यानंतर 2020 मध्ये पुन्हा एकदा बिहारमध्ये विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत नितीश कुमार यांनी भाजप सोबतच निवडणूक लढले आणि विजयी ही मिळवला. या निवडणुकीत नितीश यांच्या पक्षाला केवळ 43 जागा तर भाजपला 74 आणि लालू यांच्या आरजेडीला 75 जागा मिळाल्या होत्या. तरी देखील जेडीयू भाजप युतीमध्ये नीतीश यांनाच मुख्यमंत्री करण्यात आला.

त्यानंतर दोन वर्षांनी लगेचच म्हणजे 2022 मध्ये नितेश कुमार यांनी पुन्हा एकदा बाजू पलटली. भाजपासोबत आपलं पटत नसल्याचे अनेक कारणे देत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा लालूंचा आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत सरकार स्थापन केलं. स्वतः मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री केलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादवांच्या आरजेडीला धक्का देत भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube