राम शिंदे – विखे मतभेदावर, महसुलमंत्र्यांची मोठी ग्वाही; म्हणाले, म्‍हसोबा महाराजांच्या साक्षीने …

राम शिंदे – विखे मतभेदावर, महसुलमंत्र्यांची मोठी ग्वाही; म्हणाले, म्‍हसोबा महाराजांच्या साक्षीने …

Radhakrishna Vikhe Patil : माझ्या आणि आ.राम शिंदे यांच्यामध्ये आता कोणतेही मतभेद राहीलेले नसुन यापुढील सर्व निवडणूका आम्ही एकत्रित येवून एक विचाराने लढविणार आहोत,” अशी ग्‍वाही राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) व माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे (Ram Shinde) यांनी आज जामखेड शहरातील चुंभळी येथील जाहीर सभेत दिली.

आज जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आ.राम शिंदे यांनी जामखेडमधील जामवाडी, तपनेश्‍वर, मुख्‍य बाजारपेठ, शिवाजी नगर, संताजी नगर, सदाफुले वस्‍ती, आरोळे वस्‍ती आणि चुंभळी येथे लोकसभा निवडणूक प्रचाराच्‍या निमित्‍ताने नागरिकांशी संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाची माहिती देत पुन्हा एकदा विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले. याप्रसंगी आ.राम शिंदे, शिवसेना नेते बाबुशेठ टायरवाले, भाजपा नेते विनायकराव देशमुख यांच्‍यासह स्‍थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

आज चुंभळी येथील कार्यक्रमामध्ये उपस्थितांनी आ.राम शिंदे यांच्‍यावर होणाऱ्या अन्‍यायाचा प्रश्‍न राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर उपस्थित केला. आ.शिंदे यांनीच या चर्चेत हस्‍तक्षेप करुन,” मंत्री विखे पाटील आणि माझ्यामध्‍ये आता कोणतेही मतभेद राहीलेले नाहीत. आपल्‍याला आता महायुतीच्‍याच उमेदवाराचे काम करायचे आहे. या भागातून शंभर टक्‍के मतदान हे महायुतीच्‍या उमेदवारालाच होईल, असे काम करायचे आहे .” असे सांगून त्‍यांनी हा विषय संपविला.

फडणवीस सुडाचं राजकारण करतात?; तावडेंनी वाटचाल सांगत उघड केले पत्ते…

यानंतर महसूल मंत्री विखे पाटील यांनी देखील या विषयावरून श्री.मस्कोबा महाराजांच्‍या देवस्‍थानाचा उल्लेख करून आमच्या लोणी बुद्रूक गावाचे ग्रामदैवत सुध्‍दा म्‍हसोबा महाराज आहेत. या देवस्‍थानांच्‍या साक्षीने सांगतो की, “आमच्‍या दोघांमध्‍ये आता कोणतेही मतभेद नाहीत. यापुढील सर्व निवडणूका आम्ही एकत्रितपणेच लढविणार आहोत. याबाबत कुणीही मनात संभ्रम ठेवु नये.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज