Vinod Tawde : फडणवीस सुडाचं राजकारण करतात?; तावडेंनी वाटचाल सांगत उघड केले पत्ते…

Vinod Tawde : फडणवीस सुडाचं राजकारण करतात?; तावडेंनी वाटचाल सांगत उघड केले पत्ते…

Vinod Tawde : राजकीय पक्षांवर यंत्रणांचा दबाव असता तर आज संजय राऊत (Vinod Tawde) भाजपमध्ये (BJP) आले असते, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी आज पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये केला. त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्नांची उत्तर देत शरद पवारांसह (Sharad Pawar) शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विनोद तावडे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सुडाच राजकारण करत नाहीत, जर ते सुडाच राजकारण करत असते तर ते आज राज्याचे मुख्यमंत्री झाले असते असं देखील यावेळी विनोद तावडे म्हणाले. तर आपण पुन्हा राज्याचे राजकारणात एन्ट्री करणार नसून फक्त राष्ट्रीय राजकारणात लक्ष देणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली. ओन्ली राष्ट्र-नो महाराष्ट्र असे म्हणत त्यांनी याची माहिती दिली.

पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना सबोतच्या युतीबद्दल देखील त्यांनी भाष्य केले. विनोद तावडे म्हणाले, आम्ही शिवसेनाबरोबर विचारांवर युती केली होती मात्र आता त्यांचे विचार बदलले आहे असं विनोद तावडे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे यावर बोलताना विनोद तावडे म्हणाले, आतापर्यंत अनेक जणांवर चार्जशीट दाखल करण्यात आली आहे मात्र विरोधी पक्षांकडून हे सगळे दबावतंत्र असल्याचे बोलले जात आहे मात्र जर हे दबावतंत्र असते तर आज संजय राऊत भाजपमध्ये आले असते असं देखील तावडे म्हणाले. तर भाजपमध्ये सर्व निर्णय हे केद्रीय नेत्यांशी चर्चा करुन घेतले जातात. मी राज्याच्या राजकारणात येणार नाही सध्या माझी भूमिका ओन्ली राष्ट्र-नो महाराष्ट्र अशीच आहे, असं त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.

हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील प्रचार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत विनोद तावडे म्हणाले की, प्रचारादरम्यान शरद पवार यांनी सुनेबद्दल जे काही बोलले हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील प्रचार असू शकत नाही.

भारतात WhatsApp ची मोठी कारवाई, तब्बल 80 लाख अकाऊंट्सवर बंदी, ‘हे’ आहे कारण

सध्या राज्यात विरोधकांकडून ज्या पद्धतीने प्रचार केला जात आहे ते शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील प्रचार नाही. असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज