भारतात WhatsApp ची मोठी कारवाई, तब्बल 80 लाख अकाऊंट्सवर बंदी, ‘हे’ आहे कारण

भारतात WhatsApp ची मोठी कारवाई, तब्बल 80 लाख अकाऊंट्सवर बंदी, ‘हे’ आहे कारण

WhatsApp Accounts Ban : देशासह संपूर्ण जगात लोकप्रिय असलेले मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने (WhatsApp) पुन्हा एकदा देशात मोठी कारवाई करत मार्च 2024 मध्ये तब्बल 80 लाख अकाऊंट्सवर बंदी घातली आहे. Meta ने दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च ते 31 मार्च 2024 दरम्यान व्हॉट्सॲपने भारतात तब्बल 7.9 दशलक्षाहून अधिक अकाउंट्सवर बंदी घातली आहे. यूजर्ससाठी एक सुरक्षित प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी व्हॉट्सॲपने ही कारवाई केली आहे.

आपल्या नवीनतम मासिक अहवालात व्हॉट्सॲपने ही माहिती दिली आहे. 12000 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. याबाबत अधिक माहिती देत व्हॉट्सॲपने सांगितले की, यूजर्सकडून अंतिम मुदतीदरम्यान 12,782 तक्रारी मिळाले होते त्यापैकी 6,661 अकाउंट्सवर कंपनीकडून बंदी घालण्यात आली आहे. व्हॉट्सॲपला 1 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत तक्रार अपील समितीकडून (GSC) 5 अहवाल प्राप्त झाले होते. भारत सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील नागरिकांच्या चिंता दूर करण्यासाठी GSC ची स्थापना केली आहे.

व्हॉट्सॲपकडून तीन टप्प्यांत तपास करण्यात येतो

व्हॉट्सॲपने आपल्या मासिक अहवालात म्हटले आहे की, प्लॅटफॉर्मवर मिस यूज शोधण्यासाठी व्हॉट्सॲपकडून तीन टप्प्यांत तपास करण्यात येतो. या तपासात नोंदणीच्या वेळी, मेसेजिंग दरम्यान आणि प्लॅटफॉर्मला वापरकर्ता अहवाल आणि ब्लॉक्सच्या रूपात मिळालेला नकारात्मक प्रतिसादातचा समावेश असतो. यानंतर विश्लेषकांच्या टीमद्वारे या अहवालांचे मूल्यमापन केले जाते.

सोलापुरात मोठी दुर्घटना, स्मार्ट सिटीसाठी ठेवलेल्या पाईपांना भीषण आग; लाखोंचे नुकसान

तक्रार चॅनेलद्वारे वापरकर्त्याच्या तक्रारींना प्रतिसाद देणे आणि त्यावर कारवाई करण्याव्यतिरिक्त व्हॉट्सॲप सध्या प्लॅटफॉर्मवर यूजर्सची सेफ्टी राखण्यासाठी अनेक प्रकारच्या नवीन टूल्स आणि फीचर्सवर काम करत आहे. यामुळे येत्या काही दिवसात यूजर्सला व्हॉट्सॲपवर Meta कडून नवीन नवीन सेफ्टी फीचर्स पाहायला मिळणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज