Facebook Meta ला मोठा झटका! दररोज भरावा लागणार 82 लाखांचा दंड
Facebook Meta : फेसबुकची पॅरेंन्ट कंपनी मेटा गेल्या काही दिवसांपासून तिच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे चर्चेत आहे. त्यात आता मेटाला दर दिवशी तब्बल 82 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कंपनीला हा दंड ठोठावण्यामागे सोशल मिडीयावर युजर्सच्या डेटा प्रायव्हसीचं उल्लंघन केल्याच्या कारणावरून ठोठावण्यात आला आहे. तसेच जोपर्यंत ही कंपनी अशा प्रकारे युजर्सच्या डेटा प्रायव्हसीचं उल्लंघन होत राहिल तोपर्यंत दंड भरावाच लागणार आहे. (Facebook Meta 82 lakh fine per day for data privacy violation in Norway )
शरद पवार ठाम! ‘वेळ पडल्यास नवी चळवळ उभी करू पण, भाजपसोबत जाणार नाही’
मेटाला हा दंड नॉर्वे डेटा प्रोटेक्शन ऑथॉरिटीने ठोठावला आहे. 14 ऑगस्टपासून मेटाला 98,500 डॉलर दरदिवशी प्रमाणे हा दंड भरावा लागणार आहे. भारतीय रूपायामध्ये हा दंड 81 लाख 55 हजार एवढा आहे. तसेच जोपर्यंत ही कंपनी अशा प्रकारे युजर्सच्या डेटा प्रायव्हसीचं उल्लंघन होत राहिल तोपर्यंत दंड भरावाच लागणार आहे.
अविश्वास प्रस्ताव म्हणजे ‘बेटे को सेट करना और दामाद को भेंट करना’ : BJP खासदाराचा सोनियांवर हल्लाबोल
नॉर्वमध्ये मेटाला डेटाटिल्सिनेटने सांगितले की, मेटा युजर्सचे फिजिकल लोकेशन अॅक्सेस नाही करू शकत. तसेच त्याचा जाहिरातींसाठी वापर करू नाही शकत. तर जोपर्यंत यावर मेटा कारवाई करत नाही तो प्रर्यंत त्यांना दरदिवशी प्रमाणे हा दंड भरावा लागणार आहे. तर 14 ऑगस्टपासून मेटाला 98,500 डॉलर म्हणजे 81 लाख 55 हजार एवढा दंड भरावा लागणार आहे. हा दंड 3 नोव्हेंबरपर्यंत भरावा लागणार आहे.
नॉर्वे डेटा प्रोटेक्शन ऑथॉरिटी हा प्रस्ताव युरोपीय डेटा प्रोटेक्शन बोर्डकडे पाठवून त्याला कायमस्वरूपी करू शकते. तर युरोपीय डेटा प्रोटेक्शन बोर्डने या प्रस्तावाला सहमती दिल्यास हा दंड कायमस्वरूपी करू शकते. तर दुसरीकडे मेटाने गेल्या आठवड्यात युजर्सना त्यांना टार्गेट जाहिराती देण्याबाबत त्यांची परवानगी मागणार असल्याचं सागितलं आहे.