अविश्वास प्रस्ताव म्हणजे ‘बेटे को सेट करना और दामाद को भेंट करना’ : BJP खासदाराचा सोनियांवर हल्लाबोल

अविश्वास प्रस्ताव म्हणजे ‘बेटे को सेट करना और दामाद को भेंट करना’ : BJP खासदाराचा सोनियांवर हल्लाबोल

नवी दिल्ली : विरोधी इंडिया आघाडीने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाचा एकच अर्थ आहे. ‘बेटे को सेट करना है, दामाद को भेंट करना है..’ असं म्हणत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर टीका केली. ते म्हणााले, अविश्वास प्रस्ताव आणला आहे. हा का आणला आहे? सोनियाजी इथे आहेत. मला वाटतं त्यांना दोन गोष्टी करायच्या आहेत. ‘बेटे को सेट करना है और दामाद को भेंट. करना है…’ हाच या प्रस्तावाचा उद्देश आहे, अशी टीका त्यांनी केली. मात्र दुबे यांचे हे वक्तव्य ऐकताच सोनिया गांधी यांनाही हसू अनावर झाले. (BJP MP Nishikant Dubey criticized Congress leader Sonia Gandhi on No Confidence Motion)

इंडिया आघाडीने मोदी सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत आजपासून (8 ऑगस्ट) चर्चा सुरु झाली आहे. मात्र चर्चेची सुरुवातच अत्यंत वादळी झाली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी चर्चेची सुरुवात केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. याचवेळी त्यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरही हल्लाबोल केला. यानंतर बोलताना दुबे यांनी काँग्रेसवर टीका केली.

काय म्हणाले दुबे?

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला नुकतीच स्थगिती दिली आहे. पण निकाल दिलेला नाही, हेही ध्यानात घ्यावे. मी माफी मागणार नाही, असे ते म्हणतात. दुसरी गोष्ट ते म्हणतात की मी सावरकर नाही. पण तुम्ही आयुष्यात कधीच सावरकर होऊ शकत नाही… त्या माणसाने 28 वर्षे तुरुंगात काढली आहेत. सावरकर कधीच होऊ शकत नाही. ही I.N.D.I.A आघाडी बनवली आहे, पण येथे काहीच खासदार असतील जे याचा अर्थ सांगू शकतील. पण बाकीचेही ‘इंडिया-इंडिया’ बोलत आहेत.

अविश्वास प्रस्ताव आणला आहे. हा का आणला आहे? सोनियाजी इथे आहेत. मला वाटतं त्यांना दोन गोष्टी करायच्या आहेत. ‘बेटे को सेट करना है और दामाद को भेंट. करना है…’ हाच या प्रस्तावाचा उद्देश आहे. दुबे पुढे म्हणाले की, पंतप्रधान म्हणतात की हा अविश्वासाचा प्रस्ताव नाही, तर विरोधी पक्षात कोण कोणासोबत आहे, हे बघण्यासाठी हा विश्‍वासाचा प्रस्ताव आहे.

मला वाटायचे की राहुल गांधी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेची सुरुवात करतील. तो मोठा मुद्दा असेल आणि नियमांचा फायदा घेऊन ते आक्रमक होतील. पण बहुतेक राहुलजी आज तयार नव्हते, उशिरा उठले असावेत, त्यांना बोलता येत नसेल. काही हरकत नाही, गौरव गोगोई चांगले बोलले. गोगोई यांनी मणिपूरबद्दल बोलताना संपूर्ण संसदेला आव्हान दिले की आम्ही मणिपूर पाहिले नाही. पण मी मणिपूरच्या इतिहासाचा बळी आहे. माझ्या मामाचा मणिपूरमध्ये पाय गमावला आहे, अशी आठवणही दुबे यांनी सांगितली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube