Ajinkya Rahane : निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणे पुन्हा मैदानात; ‘या’ लीगमध्ये खेळताना दिसणार
Ajinkya Rahane : भारताचा स्टार खेळाडू अजिंक्य राहणेने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून
Ajinkya Rahane : भारताचा स्टार खेळाडू अजिंक्य राहणेने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अजिंक्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती मात्र आता अजिंक्य राहणेने मोठी घोषणा करत पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. ‘युरोपियन टी20 प्रीमियर लीग’ (ETPL) मध्ये अजिंक्य राहणे खेळताना दिसणार आहे. रहाणे आगामी हंगामात ‘ॲमस्टरडॅम फ्लेम्स’ (Amsterdam Flames) संघाकडून खेळणार आहे.
अजिंक्य रहाणे ‘युरोपियन टी20 प्रीमियर लीग’च्या पहिल्या हंगामासाठी ‘मार्की खेळाडू‘ (प्रमुख खेळाडू) म्हणून संघात सामील होत असल्याची माहिती ‘ॲमस्टरडॅम फ्लेम्स’ ने दिली आहे.
190 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या रहाणेने आपल्या संयमी नेतृत्वामुळे, तांत्रिक कौशल्यामुळे आणि खेळाप्रती असलेल्या निष्ठेमुळे सहकारी खेळाडू, प्रतिस्पर्धी आणि चाहते यांचा नेहमीच आदर संपादन केला आहे. ‘ॲमस्टरडॅम फ्लेम्स’मध्ये सामील होण्याचा त्यांचा निर्णय युरोपमध्ये क्रिकेटचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याची त्यांची इच्छा दर्शवतो.
‘ॲमस्टरडॅम फ्लेम्स’चे सह-संस्थापक आणि मुख्य क्रिकेट अधिकारी स्टीव्ह वॉ यांनी रहाणे यांचे क्लबमध्ये स्वागत केले. हे माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार यापूर्वीच संघाशी जोडले गेले होते. स्टीव्ह वॉ यांनी रहाणेचे कौतुक केले.
357 मेट्रिक टनचा बफार स्टॉक खुला ; आ. खताळांच्या सूचनेनंतर कृषी विभागाने केले नियोजन
स्टीव्ह वॉ म्हणाला की, “अजिंक्य रहाणेकडे एक व्यावसायिक क्रिकेटपटूसाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत – कौशल्य, चिकाटी, नम्रता आणि नेतृत्व. आपल्या कारकिर्दीत त्याने क्रिकेटच्या जगात प्रचंड आदर मिळवला आहे. केवळ त्यांच्या कामगिरीमुळेच नाही, तर मैदानावर आणि मैदानाबाहेर ते ज्या प्रकारे वागतात, त्यावरूनही. मी स्वतः त्याला दबावाखाली शांत राहताना आणि नेतृत्व करताना पाहिले आहे आणि हे गुण ‘विजयी संस्कृती’ (Winning Culture) निर्माण करण्यास मदत करतात. ‘ॲमस्टरडॅम फ्लेम्स’ला युरोपमधील सर्वोत्तम क्रिकेट क्लबपैकी एक म्हणून घडवताना त्यांचा अनुभव, नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व अत्यंत मोलाचे ठरेल.”