अभिजीत दिपकेंनी PSI अधिकाऱ्याला थेट घराबाहेर काढले, नेमकं कारण काय?

Abhijit Dipke Asks PSI to Leave House Viral Video घरात आलेल्या नागरिकांशी उद्धट वागणुकीचा आरोप; "मला तुम्हाला माझ्या घरात पाहायचं नाही" अभिजीत दिपकेंनी PSI ला घराबाहेर काढलं, व्हिडिओ व्हायरल

Abhijit Dipke

Abhijit Dipke Asks PSI to Leave House Viral Video : ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिपके आपल्या घरी आलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला (PSI) थेट जाब विचारताना आणि घराबाहेर जाण्यास सांगताना दिसत आहेत. आपल्या घरी भेटायला आलेल्या नागरिकांशी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने उद्धट वागणूक दिल्याचा आरोप करत दिपके संतापल्याचे या व्हिडिओतून पाहायला मिळते.

‘जंतर-मंतर’वरील आंदोलनाचे ठिकाणच बंद का करत नाही ? दिल्ली उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

घडलेल्या प्रकारानुसार, अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी काही नागरिक त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप दिपके यांनी केला. यामुळे संतप्त झालेल्या दिपकेंनी संबंधित अधिकाऱ्याला त्याची ओळख विचारत थेट जाब विचारला.

“मी माझ्या घरात लोकांशी बोलत आहे, याचा तुम्हाला काय त्रास आहे? मी तुम्हाला इथे पहिल्यांदाच पाहतोय. तुम्ही कोणत्या विभागाचे आहात? तुमचं पोलीस स्टेशन कोणतं? तुम्ही कोणत्या पदावर आहात? यांचं नाव लिहून घ्या,” असे दिपके अधिकाऱ्याला म्हणताना व्हिडिओमध्ये दिसतात.

क्यूआर स्कॅन करून पैसे पाठवताना भविष्यात मोजावे लागणार शुल्क? लोकसभेत मंजूर विधेयकामुळे नवा प्रश्न

त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्याला आणखी सुनावत, “मी कोणाशी बोलायचं आणि कोणाला भेटायचं हे ठरवणारे तुम्ही कोण? लोक मला भेटायला येत आहेत. मला तुम्हाला माझ्या घरात पाहायचं नाही. कृपया तुम्ही बाहेर जा. माझ्याकडे येणाऱ्या लोकांशी अशा पद्धतीने बोललेलं मला अजिबात चालणार नाही. ही बोलायची पद्धत नाही,” असे दिपकेंनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

व्हिडिओमध्ये दिपके वारंवार “मला तुम्हाला माझ्या घरात पाहायचं नाही, तुम्ही बाहेर जा,” असे म्हणत संबंधित पोलीस अधिकाऱ्याला घराबाहेर जाण्यास सांगताना दिसतात. तसेच अधिकारीही त्यांत्या घराबाहेर जाताना दिसतात. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत असून, यावर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, या प्रकरणाबाबत संबंधित पोलीस विभागाकडून अद्याप अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.

follow us