WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता विनाइंटरनेट पाठवता येणार पिक्चर्स अन् फाईल्स

WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी! आता विनाइंटरनेट पाठवता येणार पिक्चर्स अन् फाईल्स

WhatsApp Users Can Send Pictures and Files without Internet : व्हॅट्सअॅपच्या ( WhatsApp ) वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. व्हाट्सअप कडून एक नवीन फीचर विकसित केले जात आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना यापुढे इंटरनेट कनेक्शन ( Internet ) शिवाय फोटो आणि फाइल्स ( Pictures and Files ) शेअर करता येणार आहेत.

नाथाभाऊंच्या भाजपवापसीला ब्रेक! राज्यातील नेत्यांचा दिल्लीत डाव अन् रखडला पक्षप्रवेश

व्हॅट्सअॅप बीटा इन्फो यांनी सांगितला आहे की, व्हॅट्सअॅपच्या वापरकर्त्यांकडून शेअर केली जाणारी माहिती. लीक होऊ नये, त्यासोबत कोणतीही छेडछाड होऊ नये. यासाठी व्हॅट्सअॅपकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच यापुढे इंटरनेट कनेक्शन शिवाय फोटो आणि फाइल्स पाठवता येणार आहेत. व्हॅट्सअॅपच्या या लवकरच येणाऱ्या फीचरची सध्या चाचणी सुरू आहे. अँड्रॉइड फोनमधील नियर बाय शेअरिंग किंवा क्विक शेअर जे ब्लूटूथच्या माध्यमातून दोन डिव्हाईसला शेअरिंगसाठी जोडले जाते. त्याद्वारे व्हॅट्सअॅपचे हे नवीन फिचर काम करणार आहे.

Ranveer Singh: डीपफेक व्हिडिओ प्रकरणात रणवीर पुरताच अडकला, FIR दाखल

त्यामुळे या नव्या फीचरनुसार विना इंटरनेट कनेक्शन जरी वापरकर्त्यांना फोटो आणि फाइल्स पाठवता येणार असल्या. तरी देखील ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीच्या एरियामध्ये म्हणजेच जवळ असणाऱ्या दोन डिव्हाईसमध्येच अशा प्रकारचं शेअरिंग करता येणार आहे. दूर असणाऱ्या वापरकर्त्यांना अशाप्रकारे विना इंटरनेट शेअरिंग करता येणार नाही. तसेच हे नवीन फिचर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या फोटो गॅलरीचा आणि लोकेशन चा ऍक्सेस द्यावा लागणार आहे.

व्हॅट्सअॅपचं येणार हे फिचर बहुतांशी एप्पलच्या शेअर आयटी आणि गुगलच्या क्विक शेअर सारखं काम करणार आहे. या सर्व शेअरिंग पर्यायांमध्ये इंटरनेट शिवाय फोटो आणि शेअर करता येतात. त्याचप्रमाणे आता व्हॅट्सअॅपवर देखील इंटरनेट कनेक्शनशिवाय फोटो आणि फाइल्स शेअर करता येणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube