WhatsApp वर येतंय भन्नाट फीचर! इंस्टाग्रामवर थेट स्टेटस शेअर करता येणार…

WhatsApp वर येतंय भन्नाट फीचर! इंस्टाग्रामवर थेट स्टेटस शेअर करता येणार…

WhatsApp : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आहे. स्मार्टफोन (smartphone)असलेल्या प्रत्येक युजरकडे हे अ‍ॅप आपल्याला दिसून येतं. वापरण्यास अगदी सोपं असल्यानं त्याची लोकप्रियता देखील वाढत आहे. त्यामुळे मेटा कंपनी (Meta)या अ‍ॅपमध्ये सातत्याने अपडेट करत असते. जगभरातील 2 अब्जाहून अधिक लोक चॅटिंग, व्हॉईस कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलसाठी WhatsApp वापरतात. त्यातच आता व्हॉट्सअॅप स्टेटसबद्दल (Whatsapp status)एक नवीन फीचर युजर्सला मिळणार आहे.

पंतप्रधानांचे सुरक्षा प्रमुख ते राजकीय नेता अन् थेट मुख्यमंत्री! मिझोरामच राजकारण बदलणारा IPS

आत्ताच्या घडीला जेव्हा युजर्स त्यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस शेअर करतात तेव्हा त्यांना फेसबुक स्टोरीवर शेअर करण्याचा पर्याय मिळतो. आता मात्र लवकरच कंपनी वापरकर्त्यांना आणखी एक पर्याय देणार आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, आता युजर्स फेसबुक आणि इन्स्टाग्राम स्टोरीवर देखील व्हॉट्सअॅप (WhatsApp) स्टेटस शेअर करु शकणार आहेत.

Letsupp Special : भाजप बंडखोरांना वापरुन संपवते का? सिंधिंयांसोबतच्या आमदारांचे काय झाले?

व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या या फीचरची माहिती कंपनीवर लक्ष ठेवणाऱ्या वेबसाइट Wabetainfo ने दिली आहे. हे फीचर आल्यानंतर युजर्सना पूर्वीपेक्षा जास्त सुविधा मिळणार आहेत. आता यूजर्स एकाच वेळी तीन ठिकाणी एक स्टेटस शेअर करू शकणार आहेत.

व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम या तिनही कंपन्या मेटाच्या मालकीच्या आहेत. मेटा वेगानं तिन्ही प्लॅटफॉर्म अपग्रेड करत आहे. त्यामुळे कोट्यवधी युजर्सला सोशल मीडियामध्ये नवीन अनुभव मिळत राहतील. या फीचरचा स्क्रीनशॉटही Wabeta ने शेअर केला आहे.

व्हॉट्सअॅप आपल्या लाखो युजर्सच्या प्रायवसीची देखील विशेष काळजी घेते. त्यामुळे युजर्स देखील त्याचा वापर बिनधास्तपणे करत आहेत. नुकतेच कंपनीने आपल्या यूजर्सना सीक्रेट कोड फीचर दिले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या पर्सनल चॅट्स किंवा सिक्रेट चॅटला डबल संरक्षण देऊ शकतील. हे फीचर फोनच्या लॉक फीचरपेक्षा वेगळे असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube