पंतप्रधानांचे सुरक्षा प्रमुख ते राजकीय नेता अन् थेट मुख्यमंत्री! मिझोरामच राजकारण बदलणारा IPS

पंतप्रधानांचे सुरक्षा प्रमुख ते राजकीय नेता अन् थेट मुख्यमंत्री! मिझोरामच राजकारण बदलणारा IPS

चार राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आज (4 डिसेंबर) मिझोराम निवडणुकीचेही निकाल जाहीर झाले. यात 40 पैकी 27 जागा जिंकत झोराम पीपल्स मूव्हमेंटने (झेडपीएम) घवघवीत यश मिळविले आहे. तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटची गाडी 10 जागांवर थांबली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपलाही अवघ्या दोन आणि विरोधी पक्ष काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली आहे. या निकालातील आकडेवारीनंतर 74 वर्षीय माजी IPS अधिकारी आणि झोराम पीपल्स मूव्हमेंटचे (Zoram People’s Movement) नेते लालदुहोमा (Lal Duhoma) हे मिझोरामचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. (74-year-old former IPS officer and Zoram People’s Movement leader Lal Duhoma will be sworn in as the next Chief Minister of Mizoram.)

कोण आहेत लालदुहोमा?

22 फेब्रुवारी 1949 रोजी मिझोरामच्या तुआलपुई गावात जन्मलेल्या लालदुहोमा यांची राजकीय क्षेत्रात जुनी ओळख आहे. आयपीएस अधिकारी म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा दलातही होते. तिथूनच त्यांची राजकीय जवळीक वाढली आणि 1984 मध्ये मिझोराममधून लोकसभेवर निवडून येऊन त्यांनी इतिहास रचला.

लालदुहोमा यांनी त्यांच्या आयपीएस कारकिर्दीत गोव्यात स्क्वाड लीडर म्हणून काम केले. तिथे त्यांनी गुन्हेगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिप्पी आणि तस्करांवरील कारवाईचे नेतृत्व केले. गोव्यातील एक स्क्वाड लीडर म्हणून त्यांच्या कामगिरीने राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतले. यानंतर त्यांची 1982 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा पथकात प्रभारी म्हणून नवी दिल्ली येथे बदली झाली.

इंदिरा गांधींच्या प्रभावाने 1984 मध्ये राजकारणात प्रवेश :

इंदिरा गांधींच्या प्रभावामुळे लालदुहोमा यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला. ते काँग्रेस पक्षात सामील झाले. 31 मे 1984 रोजी त्यांची मिझोराम काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. मिझोरम नॅशनल फ्रंट (मिझोराम भारतापासून वेगळे राज्य बनवायचे या उद्देशाने स्थापन झालेली एक वेळची बंडखोर संघटना) आणि भारत सरकार यांच्यातील शांततेच्या चर्चांमधील दुवा म्हणून काम करायचे हे त्यांच्या राजकीय प्रवेशाचे प्रमुख उद्दिष्ट्य होते.

“पराभवाचा राग संसदेत काढू नका” : अधिवेशनाच्या सुरुवातीलाच PM मोदींचा काँग्रेसला टोला

लालदुहोमा यांनी मिझोरम नॅशनल फ्रंटचा नेता आणि भारत सरकारविरुद्ध बंड पुकारलेल्या लालडेंगा याची भारतात परतण्याची व्यवस्था केली. 31 ऑक्टोबरला दुपारी लालडेंगा आणि इंदिरा गांधी यांची भेट होणार होती, पण त्याच दिवशी सकाळी इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यानंतर डिसेंबर 1984 मध्ये लालदुहोमा यांनी मिझोराम मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. पण त्याच वर्षी त्यांना काँग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.

पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरलेले पहिलेच आमदार :

लालदुहोमांच्या अपेक्षेनुसार मिझोराममध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस पक्ष पावले उचलत नव्हता, म्हणून त्यांनी 1986 मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला. पण त्यांचा हा राजीनामा पक्षांतरविरोधी कायद्याचे उल्लंघन मानण्यात आले आणि 24 नोव्हेंबर 1988 रोजी त्यांना अपात्र ठरवण्यात आले. अपात्रतेचा सामना करणारे देशातील पहिले खासदार ठरले होते.

झोरम पीपल्स मूव्हमेंटची स्थापना :

1986 मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर लालदुहोमांनी मिझो नॅशनल युनियनची स्थापना केली. पुढील काळात ही संघटना मिझोराम पीपल्स कॉन्फरन्समध्ये विलीन झाली. लालदुहोमा हे या पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनले. 2018 च्या निवडणुकीपू्र्वी हा पक्ष झोरम पीपल्स मूव्हमेंटमध्ये विलिन झाला. झोरम पीपल्स मूव्हमेंट हा सहा संघटनांनी एकत्रित येऊन स्थापन केलेला पक्ष आहे. यात मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स, झोरम नॅशनल पार्टी, झोरम एक्सोडस मूव्हमेंट, झोरम विकेंद्रीकरण फ्रंट, झोरम रिफॉर्मेशन फ्रंट, मिझोराम पीपल्स पार्टी हे प्रमुख पक्ष आहेत.

2018 मध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंटने लालदुहोमांना अधिकृतपणे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. पण झोरम पीपल्स मूव्हमेंटला त्यावेळी भारतीय निवडणूक आयोगाकडून अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळू शकली नाही. त्यामुळे लालदुहोमा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. आयझॉल पश्चिम 1 आणि सेरछिप या दोन्ही मतदारसंघातून ते निवडून आले. त्यानंतर त्यांनी सेरछिप मतदारसंघाचे प्रतिनिघधित्व कायम ठेवले. तिथे त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री लाल थनहवला यांचा 410 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर त्यांची मिझोराम विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.

2020 मध्ये लालदुहोमांचे विधानसभा सदस्यत्व रद्द :

2019 मध्ये नोंदणीकृत राजकीय पक्ष बनल्यानंतर त्यांनी झोरम पीपल्स मूव्हमेंटचे नेते म्हणून त्यांनी काम सुरू केले. पण सप्टेंबर 2020 मध्ये सत्ताधारी पक्ष मिझो नॅशनल फ्रंटच्या 12 आमदारांनी मिझोराम विधानसभा अध्यक्ष लालरिन्लियाना सायलो यांच्याकडे एक ठराव मांडला आणि लालदुहोमांवर पक्षांतर विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकून विधानसभेत पोहोचले. परंतु ते झोरम पीपल्स मूव्हमेंट पक्षाचे नेते म्हणून काम करत होते, या आधारावर लालदुहोमाचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अध्यक्षांकडे करण्यात आली.

पक्षाकडून साईड लाईन झाल्यानंतरही मध्यप्रदेशात बाजीगर ठरले मामांजी; असा जिंकला गड

पक्षांतर विरोधी कायद्यानुसार (परिच्छेद २ कलम २) अपक्ष निवडून आलेला सदस्य निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षात सामील झाल्यास त्याला अपात्र ठरवले जाऊ शकते. 27 नोव्हेंबर 2020 रोजी, सभापतींनी त्यांना अधिकृतपणे विधिमंडळातून अपात्र ठरवले. अशाप्रकारे पक्षांतर विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याने अपात्र ठरलेले ते भारतातील पहिले अपक्ष आमदार ठरले. अशा प्रकारे पक्षांतर विरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल लालदुहोमा यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत दोनदा विधानसभेचे सदस्यत्व गमावले होते.

आता मिझोरामचे मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत आघाडीवर :

“माझ्या झोरम पीपल्स मूव्हमेंटची नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. कायदा दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी आहे, पण मी पहिल्यापासूनच झोरम पीपल्स मूव्हमेंटला समर्पित राहिलो. माझी केस संपूर्ण भारतात अभूतपूर्व आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यानंतरही लालदुहोमांनी हार मानली नाही. 17 एप्रिल 2021 रोजी सेरछिप मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ते 3 हजार 310 मतांचे मताधिक्य मिळवत पुन्हा आमदार झाले. आता 2023 मध्ये ते पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले असून त्यांचा पक्षही आता सत्तेत आला आहे. आता ते मिझोरामचे पुढील मुख्यमंत्री बनणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube