Letsupp Special : भाजप बंडखोरांना वापरुन संपवते का? सिंधिंयांसोबतच्या आमदारांचे काय झाले?

Letsupp Special : भाजप बंडखोरांना वापरुन संपवते का? सिंधिंयांसोबतच्या आमदारांचे काय झाले?

भाजप गरज संपली की बंडखोरांना वापरुन संपवून टाकते. पुढच्या निवडणुकीत बघा आता एकनाथ शिंदे, अजितदादांचे काय होते ते.

महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) बंड झाले, ते मुख्यमंत्री बनले. वर्षभराच्या अंतराने अजितदादांनी (Ajit Pawar) बंड केले, ते उपमुख्यमंत्री बनले. या दोन्ही बंडांनंतर मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. इशारे, प्रतिइशारे देऊन झाले. पण या सगळ्यात आजही दबक्या आवाजात वरील वाक्य नेहमी ऐकू येते. सोशल मीडिया, कट्ट्यावरच्या गप्पा, नेते यांच्यामध्ये याबाबतच्या चर्चा आजही सातत्याने होत असतात. पण खरंच भाजप गरज संपल्यानंतर बंडखोरांना संपवून टाकते का? पुढच्या निवडणुकीत भाजप बंडखोरांना साईडलाईन करते का? या प्रश्नाचे उत्तर काहीसे कालच्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक निकालातून मिळू शकते. (What happened to the 19 MLAs who rebelled with Jyotiraditya Sindhia and joined the BJP)

मध्यप्रदेशमध्ये काय घडले?

मध्य प्रदेशात भाजपने दणदणीत बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. भाजपला 230 पैकी तब्बल 164 जागांवर विजय मिळविला आहे. पण या लाटेतही काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थक चार मंत्र्यांसह सात आमदारांचा दारुण पराभव झाला आहे. तर सहा आमदारांना भाजपनेच तिकीट नाकारत घरी बसवले होते. केवळ सहा उमेदवारच विजयी होऊन विधानसभेत परतले आहेत. 2020 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 19 आमदारांसह बंडखोरी करत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पक्षाकडून साईड लाईन झाल्यानंतरही मध्यप्रदेशात बाजीगर ठरले मामांजी; असा जिंकला गड

या 19 आमदारांपैकी 13 आमदारांना भाजपने यावेळच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा तिकीट दिले होते. ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही विधानसभा निवडणुकीदरम्यान 70 सभा आणि रोड शो केले. या काळात सिंधिया समर्थक मंत्री आणि आमदारांच्या मतदारसंघात बैठकाही घेण्यात आल्या, परंतु निवडणूक निकाल सिंधिया समर्थक नेत्यांसाठी निराशाजनक ठरला आहे.

सिंधिया समर्थक मंत्र्यांपैकी महेंद्र सिसोदिया, सुरेश धाकड, राजवर्धन सिंह दत्तीगाव आणि रामखेलावन पटेल यांना पराभवाचा तोंड बघावे लागले आहे. पराभूत झालेल्या सात आमदारांमध्ये पोहरीमधून सुरेश धाकड, बामोरीमधून महेंद्र सिसोदिया, मुरैनामधून रघुराज कंसाना, अंबामधून कमलेश जाटव, डबरामधून इमरती देवी, अशोक नगरमधून जजपालसिंग जज्जी आणि बदनावारमधून राजवर्धन दात्तीगाव यांचा समावेश आहे. 2020 च्या पोटनिवडणुकीतही इमरती देवी यांचा पराभव झाला होता. पण त्यानंतरही भाजपने त्यांना यावेळी पुन्हा तिकीट दिले.

या सिंधिया समर्थकांना तिकीटच नाकारले :

2020 मध्ये सिंधिंयासोबत बंडखोरी करणारे आमदार गिरराज दंडोतिया, ओपीएस भदौरिया, रणवीर जाटव, मुन्नालाल गोयल, रक्षा सिरोनिया आणि जसवंत जाटव यांना यावेळी तिकीट दिले नव्हते. तर विजयी झालेल्यांमध्ये सिंधिया समर्थक मंत्री प्रद्युम्न सिंग तोमर, ब्रिजेंद्र यादव, गोविंद सिंग राजपूत, डॉ. प्रभुराम चौधरी, मनोज चौधरी आणि तुस्ली सिलावत यांचा समावेश आहे.

“पराभवाचा राग संसदेत काढू नका” : अधिवेशनाच्या सुरुवातीलाच PM मोदींचा काँग्रेसला टोला

कर्नाटकमध्ये काय घडले?

2019 साली काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) मधील तब्बल 17 आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर यावर्षी झालेल्या निवडणुकीत 17 पैकी दोन आमदारांनी या वेळी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. तर एका आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांचा पराभव झाला. उर्वरित 14 आमदारांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र यापैकी तब्बल आठ जणांचा पराभव झाला, फक्त सहा आमदारांनाच आपला मतदारसंघ राखता आला. म्हणजे, 17 पैकी सहा आमदारच आपली राजकीय कारकीर्द यशस्वी ठेवू शकले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube