मी पुराव्यांशिवाय आरोप करत नाही, तुम्ही वेळ द्या, पुरावे देतो; रोहित पवारांनी मागितली फडणवीसांकडे वेळ

मी पुराव्यांशिवाय आरोप करत नाही, तुम्ही वेळ द्या, पुरावे देतो; रोहित पवारांनी मागितली फडणवीसांकडे वेळ

Rohit Pawar : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केला. शिरसाट यांनी ५००० कोटी रुपयांचा जमीन घोटाळा केल्याचे ते म्हणाले. त्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देताना असे आरोप दररोज होतात, पुरावे सादर करा, असं म्हटलं. त्यानतंर आता रोहित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटीची वेळ मागितली.

निवडणूक आयोगावर शंका घेतली, नंतर माफीनामा! संजय कुमारांवर गुन्हा दाखल… 

मी कधीही पुराव्यांशिवाय आरोप करत नाही. सिडको प्रकारणात मंत्री शिरसाटांनी बिवलकर कुटुंबाला ज्या बेकायदा पद्धतीने भूखंड दिले, ते सर्व पुरावे पत्रकारांना दिले आहेत. आपणही भेटीची वेळ द्यावी, आपल्यालाही याबाबतचे सर्व पुरावे दिले जातील, असं रोहित पवार म्हणाले.

मी पुराव्यांशिवाय आरोप करत नाही…
रोहित पवार यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं की, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मी कधीही पुराव्यांशिवाय आरोप करत नाही. सिडको प्रकारणात मंत्री संजय शिरसाठ साहेब यांनी बिवलकर कुटुंबाला ज्या बेकायदा पद्धतीने भूखंड देण्याचा निर्णय घेतला त्याचे सर्व पुरावे पत्रकारांना दिले आहेत. आपणही भेटीची वेळ द्यावी, आपल्यालाही याबाबतचे सर्व पुरावे दिले जातील. आपण अभ्यासू आहात हे मान्य करतो. त्यामुळं मी दिलेले पुरावे अभ्यासल्यानंतर आपण स्वतःहूनच या भ्रष्टाचारी मंत्र्याची हकालपट्टी केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी आपण भेटीची वेळ द्यावी, असं रोहित पवारांनी म्हटलं.

पुढं त्यांनी लिहिलं की, शिवाय, याच जागेबाबत आम्ही आणखी काही कागदपत्रांची मागणी सिडको आणि विधी व न्याय विभागाकडं केली आहे. यामध्ये दडवण्यासारखं काहीही नसेल तर ही कागदपत्रंही तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना आपण संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात, ही विनंती, असं रोहित पवार म्हणाले.

काय प्रकरण आहे?

रोहित पवार यांनी सिडकोच्या भूखंड वाटपात अनियमितता केल्याचा आरोप केला आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला बेकायदेशीरपणे भूखंड वाटप केल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी या प्रकरणातील कथित गैरव्यवहारांचे पुरावे पत्रकारांसमोर सादर केले असून ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरही मांडण्यात तयार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube