जीवाची पर्वा न करता लढलो पण…, सिंचन घोटाळा प्रकरणी अंजली दमानियांची भावनिक पोस्ट

जीवाची पर्वा न करता लढलो पण…, सिंचन घोटाळा प्रकरणी अंजली दमानियांची भावनिक पोस्ट

Anjali Damaniya On Maharashtra Irrigation Scam : सिंचन घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत 303 कोटी रुपयांची भरपाई एफ. ए. एंटरप्रायजेसला देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहे. उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशानंतर राज्य सरकारवर जोरदार टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी ट्विट करत लढून काहीच उपयोग नाही असे वाटायला लागले आहे. अशी भावनिक पोस्ट केली आहे.

अंजली दमानिया यांनी एक्स वर पोस्ट करत लिहिले आहे की, लढून काहीच उपयोग नाही असे वाटायला लागले आहे. जीवाची पर्वा न करता, वेड्यासारखे सिंचन घोटाळ्या विरुद्ध लढलो. त्या निसार खत्री नावाच्या काँट्रॅक्टर ला जेल मध्ये पाठवले, आणि आज त्याच व्यक्तिला, उरलेले 300 कोटी देण्याचा आदेश, उच्च न्यायालयाने दिला. लढण्याची टाकत आणि इच्छा दोन्हीही संपत चालली आहे. अतोनात दुःख होतय. असं अंजली दमानिया यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणात एफ. ए. एंटरप्रायजेस कंपनी विरोधात एसीबीने तीन हजार पानाचे आरोपत्र दाखल करत गंभीर अनियमितता झाल्याचा ठपका ठेवला होता. या घोटाळ्यात अनेक राजकीय नेत्यांची नावे समोर आली होती. मात्र आता उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या आदेशानंतर विरोधक चारही बाजूने राज्य सरकारवर टीका करत आहे.

मोठी बातमी, संजय कुमार यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिली होती चुकीची आकडेवारी

बाळगंगा धरण प्रकल्पावर या सिंचन घोटाळ्यावरुन तत्कालीन सरकारला विरोधकांनी चांगलाच कोंडीत पकडले होते. या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. तर या प्रकरणात तीन हजार पानाचे आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले होते मात्र आता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर एफ. ए. एंटरप्रायजेस कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube