सावली बारचे चालक-मालक कदम कुटुंबच; अंजली दमानियांकडून थेट बारची पाहणी

Anjali Damania on Ramdas kadam and Yogesh kadam Sawali Bar : महाराष्ट्र विधिमंडाळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, कदम यांच्या आई ज्योती रामदास कदम यांच्या नावावर मुंबईतील कांदिवली परिसरातील सावली डान्सबार आहे.
महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचा हात? विजयसिंह बांगर यांचा गंंभीर आरोप
काही दिवसांपूर्वी या डान्सबारवर पोलिसांनी धाड टाकली होती आणि 22 बारबाला ताब्यात घेतले होते असं म्हणत राज्यात डान्सबारवर बंदी असताना देखील हा बार कसा सुरु आहे? असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला होता. त्यावरू राज्यात राजकारण तापलं आहे. यावादात आता सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट या सावली बारची पाहणी करत दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
या बारची पाहणी करायला गेलेल्या दमानिया यांनी सावली बारवर केलेल्या कारवाईचा एफआयआर पोलिसांकडून मागवला आहे. पण तो दिला जात नाही. एफआयआर हा पब्लिक डॉक्युमेंट आहे. तो न देण्याचं काहीही कारण नाही. तसेच अनिल परब यांनी त्यांचा लढा द्यावा. मी माझ्या राज्याचे गृहराज्यमंत्री जर अशा प्रकारे बंदी असताना डान्सबार चालवत आहे. तर मग त्यावर कारवाई का केली नाही? असा सवाल यावेळी दमानिया यांनी केला आहे.
नाना पाटेकर माझ्या जीवावर उठलेत; व्हिडिओनंतर तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप
त्याचबरोबर गेल्यावेळी मी बीडमधील एका डान्सबारची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यावर तात्काळ कारवाई झाली होती. पण आताच्या गृहराज्यमंत्र्यांचा स्वत: चाच डान्सबार असेल तर ते कशाला इतर डान्सबारवर कारवाई करतील? राजकारणात असेच सगळे धंदे असतात. तसेच रामदास कदम यांनी जरी असा डावा केला असला की, तो डान्सबार इतर कुणाला चालवायला दिला आहे. तर तसे नाही. त्याचे चालक आणि मालक दे कदम कुटुंबच आहे.
अमेरिकेने जपानची विकेट पाडली! दोन्ही देशांत मोठा व्यापार करार; जपान टॅरिफही देणार, भारताचं काय?
दरम्यान पोलिस देखील या प्रकरणी गंभीर नाही. त्यांनी कारवाईला सुरूवात केलेली नाही. त्यांना या बारचे मालक कोण? ते चालवतं कोण? हे माहिती नाही. त्यामुळे या प्रकरणी मी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिणार आहे. असं देखील यावेळी अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.