महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचा हात? विजयसिंह बांगर यांचा गंंभीर आरोप

महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचा हात? विजयसिंह बांगर यांचा गंंभीर आरोप

Mahadev Munde Murder Case : परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण आता (Mahadev Munde Murder Case) राज्यात चर्चिलं जात आहे. महादेव मुंडेंचा पोस्टमार्टम अहवाल समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. महादेव मुंडे यांची किती क्रूरपणे हत्या करण्यात आली याचा उल्लेख या अहवालातून झाला आहे. यानंतर विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषदेत या खून प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचाही सहभाग आहे, असा खळबळजनक दावा बांगर यांनी केला आहे. त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर वाल्मिक कराडच्या गुन्हेगारी कृत्यांची नव्याने चर्चा होऊ लागली आहे.

नेमकं काय म्हणाले विजयसिंह बांगर

परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराड याचा मुलगा श्री कराड याचा देखील सहभाग आहे असा आरोप बांगर यांनी पत्रकार परिषदेत केला. इतकेच नाही तर महादेव मुंडे यांची किती क्रूरपणे हत्या करण्यात आली याचे फोटोच त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. महादेव मुंडे यांच्या अंगावर 15 ते 16 खोलवर जखमा आहेत. यातून अमानुष मारहाण झाल्याचं उघड झाले.

वाल्मिक कराडचा (Walmik Karad) मुलगा श्री कराड आणि त्याच्या साथीदाराने आधी रेकी केली. त्यानंतर खून केला. 20 मिनिटे महादेव मुंडे यांना श्री कराड, गोट्या गित्ते आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली. अमानुष मारहाण करून मुंडे यांचे मांस तोडून नेण्यात आले. एका छोट्या प्लॉटमध्ये इगो हर्ट झाल्याने महादेव मुंडे यांना मारहाण झाली असे बांगर यांनी सांगितले.

नराधमांची क्रूरता! महादेव मुंडेंच्या शरीरावर 16 वार, गळा 20 सेमी खोल कापला, श्वसननलिका फाडली 

श्वसननलिकेपासून मानेपर्यंत वार

महादेव मुंडे यांची हत्या केवळ एक अपघात नव्हे, तर ती एका नियोजित, क्रूर कटाचा भाग असल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट होते. त्यांच्या श्वसननलिकेला कापण्यात आले होते. याशिवाय मुख्य रक्तवाहिन्या खोल वारांमुळे तुटल्या होत्या. शरीरावर एकूण 16 वार करण्यात आले होते. त्यामध्ये मानेवर, तोंडावर, दोन्ही हातांवर आणि छातीवर गंभीर स्वरूपाचे जखमा झाल्याचे नमूद आहे.

पीएम अहवालातील आकडेवारी अंगावर काटा आणणारी आहे. मुंडेंच्या गळ्यावर झालेला एक वार तब्बल 20 सेमी लांब, 8 सेमी रूंद, आणि 3 सेमी खोल होता. मानेच्या उजव्या बाजूने चार वार झाले होते. याशिवाय तोंड, नाक, कान, हात आणि छाती अशा शरीराच्या विविध भागांवर गंभीर जखमा झाल्या होत्या. विशेष म्हणजे, या हल्ल्यादरम्यान महादेव मुंडेंनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता, हे त्यांच्या हातांवर असलेल्या वारांवरून स्पष्ट होते.

..तर बीड जिल्हा कडेकोट बंद असेल; महादेव मुंडेंच्या पत्नीची भेट घेतल्यानंतर जरांगेंचा सरकारला इशारा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube