नगरमध्ये सुजय विखे-निलेश लंकेंमध्ये कांटे की टक्कर; विखेंची 9863 मतांची आघाडी
Lok Sabha Election Result : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यंदा कांटे की टक्कर दिसत आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात अटीतटीचा सामना होताना दिसत होती. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आधी पोस्टल मतमोजणी करण्यात आली. यामध्ये सुजय विखेंनी आघाडी घेतली होती. पोस्टल मतमोजणीत सुजय विखे यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू झाल्यानंतर दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढाई दिसून आली.
पहिल्या फेरीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखेंना 18 हजार 444 तर निलेश लंके यांना 18 हजार 224 मते मिळाली. पहिल्या फेरीत सुजय विखेंना फक्त 190 मतांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या फेरीत मात्र चित्र पालटले. नगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरु असून यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांनी 851 मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर पुन्हा सुजय विखेंनी आघाडी घेतली आहे. मतमोजणीत सुजय विखेंना 27 हजार 466 तर निलेश लंकेंना 24 हजार 997 मते मिळाली.
Ahmednagar Lok Sabha : राहुरी, पारनेरला सर्वाधिक 70 टक्के मतदान, नगर शहरात कमी मतदान, धक्का कुणाला ?
तिसऱ्या फेरीची मतमोजणी संपली तेव्हा सुजय विखेंनी मोठी आघाडी घेतल्याचे दिसून आले. तिसऱ्या फेरीनंतर सुजय विखेंनी जवळपास 7 हजार 160 मतांची आघाडी घेतली होती. यानंतर चौथ्या फेरीत निलेश लंके यांनी आघाडी तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर पाचव्या फेरीअखेर सुजय विखेंना मतांमधील अंतर आणखी वाढवलं. या फेरीत सुजय विखेंना एकूण 1 लाख 31 हजार 211 तर निलेश लंकेंना 1 लाख 21 हजार 348 मते मिळाली. या फेरीअखेर सुजय विखेंना 9 हजार 863 मतांची आघाडी मिळाली.