Ahmednagar Lok Sabha : राहुरी, पारनेरला सर्वाधिक 70 टक्के मतदान, नगर शहरात कमी मतदान, धक्का कुणाला ?

  • Written By: Published:
Ahmednagar Lok Sabha : राहुरी, पारनेरला सर्वाधिक 70 टक्के मतदान, नगर शहरात कमी मतदान, धक्का कुणाला ?

Vote Percentage increase in Ahmednagar Lok Sabha Constituency : अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी (Ahmednagar Lok Sabha) सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर दोन वेळेस निवडणूक प्रशासनाने मतदानाची आकडेवारी जाहीर केली. पण मंगळवारी रात्री निवडणूक प्रशासनाने अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात सरासरी 66.61 टक्के मतदान झाले आहे. मागील निवडणुकीपेक्षा सुमारे अडीच टक्कांनी मतदान वाढले आहे. 2019 ला 64 टक्के मतदान झाले आहे. वाढलेल्या मतदानामुळे महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) व शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची धाकधूक वाढली आहे.

6 किलो सोने अन् मुंबई, मनालीमध्ये फ्लॅट, ‘पंगाक्वीन’ कंगनाकडे किती कोटींची मालमत्ता?

राहुरी व पारनेर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. या दोन तालुक्यात तब्बल 70 टक्के मतदान झाले आहे. निलेश लंके हे आमदार राहिलेल्या त्यांचे होमग्राइंड असलेल्या पारनेर मतदारसंघात सर्वाधिक 70.13 टक्के मतदान झाले आहे. त्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात 70 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लंकेंसाठी बळ लावले होते. तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सुजय विखेंसाठी ताकद लावली आहे. दोन्ही बाजूने मतदार बाहेर पडल्याने या दोन्ही मतदारसंघात जास्त मतदान झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही तालुक्यात सर्वाधिक मतदान झाल्याने दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

बॅंक फसवणूक प्रकरणी धीरज वाधवान यांना सीबीआयकडून अटक

नगर शहरात 57 टक्के मतदान झाल्याचा अंदाज होता. परंतु शहरातील मतदानाची टक्केवारी वाढली आहे. शहरात 62.50 टक्के मतदान झाले आहे. तर श्रीगोंदा मतदारसंघात 67. 90 टक्के मतदान झाले आहे. कर्जत जामखेडला 66. 61 टक्के मतदान झाले आहे. तर शेवगाव मतदारसंघात 63 टक्के मतदान झाले आहे.

विधानसभा मतदारसंघानिहाय टक्केवारी

शेवगाव-63.03
राहुरी-70.00
पारनेर-70.13
अहमदनगर शहर-62.50
श्रीगोंदा-67.90
कर्जत-जामखेड-66.61

follow us
  • fb
  • instagram
  • youtube