मोठी बातमी ! इंडिया आघाडीत फूट पडणार ? मोठ्या पक्षाचा बैठकीवर बहिष्कार, लोकसभेत काँग्रेसची सावलीही नको
DMK -डीएमकेने मोठे राजकीय पाऊल उचलत आठ जून रोजी दिल्ली येथे होणाऱ्या इंडिया आघाडीच्या ( INDIA alliance) बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे.
DMK to skip INDIA alliance meet in Delhi-तमिळनाडूमध्ये काँग्रेस (Congress) टीव्हीकेबरोबर (TVK)
गेल्याने इंडिया आघाडीतील पक्ष डीएमके (DMK)नाराज झाला आहे. त्याचे पडसाद आता इंडिया आघाडीमध्ये उमटू लागले आहेत. डीएमकेने मोठे राजकीय पाऊल उचलत आठ जून रोजी दिल्ली येथे होणाऱ्या इंडिया आघाडीच्या ( INDIA alliance) बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. एम. के. स्टालिन यांच्या पक्षाने या निर्णयासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. तसेच लोकसभेत डीएमके काँग्रेसबरोबर बसणार नाही.
DMKने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेसच्या उपस्थितीमुळे पक्ष INDIA आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नाही. मात्र, राष्ट्रीय हिताशी संबंधित मुद्द्यांवर आपण कायम ठामपणे भूमिका मांडत राहू, असेही पक्षाने स्पष्ट केले आहे.
निवडणुकीतील पराभवानंतर दुरावा
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि डीएमके यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. मात्र, त्यानंतर काँग्रेसने अभिनेता-राजकारणी विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाला पाठिंबा दिला. त्यामुळे विजय हे मुख्यमंत्री झाले आहे. TVKने निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी करत राज्याची सत्ता मिळवली. त्यानंतर DMK आणि काँग्रेसमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. राजकीय वर्तुळात यापूर्वीपासूनच DMK काँग्रेसपासून दूर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आता INDIA आघाडीच्या बैठकीवर बहिष्कार टाकत पक्षाने काँग्रेसला बाजूला घेण्याचा निर्णय घेतला आहे.
INDIA आघाडीची बैठक
INDIA आघाडीची ही बैठक अनेक महिन्यांनंतर होत आहे. तमिळनाडू, पुडुचेरीसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. या निवडणुकांमध्ये भाजपने पश्चिम बंगाल राज्य जिंकले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना धक्का बसला. तथापि, काँग्रेसने केरळमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा सत्ता मिळवली आणि तमिळनाडूमध्येही जवळपास 60 वर्षांनंतर सरकारमध्ये सहभाग मिळवला आहे. सध्या लोकसभेत इंडिया आघाडीचे एकूण 234 खासदार आहेत. यामध्ये काँग्रेसचे 99, समाजवादी पक्षाचे 37, तृणमूल काँग्रेसचे 29 आणि DMKचे 22 खासदारांचा समावेश आहे.
लोकसभा सचिवालयाने द्रमुक (DMK) पक्षाला काँग्रेसपासून स्वतंत्रपणे बसण्यास मंजुरी दिली आहे. तमिळनाडूमध्ये टीव्हीके (TVK) नेतृत्वाखालील सरकारमध्ये काँग्रेस सहभागी झाल्यानंतर दीर्घकाळचे सहयोगी असलेल्या द्रमुक आणि काँग्रेस यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. मुख्यमंत्री M. K. Stalin यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकने लोकसभेतील आपल्या खासदारांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्याची मागणी केली होती. पक्षाने म्हटले होते की, काँग्रेससोबतची त्यांची युती आता संपुष्टात आली असून, त्यामुळे त्यांच्या खासदारांनी काँग्रेस सदस्यांच्या शेजारी बसणे योग्य ठरणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभेत द्रमुकसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.