INDIA Alliance March : मोठी बातमी, राहुल गांधी – संजय राऊत दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

INDIA Alliance March :  मोठी बातमी, राहुल गांधी – संजय राऊत दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

INDIA Alliance March : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला आहे. तर निवडणूक आयोगाविरोधात संसदेपासून निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कार्यलयापर्यंत इंडिया आघाडीकडून मोर्चा (INDIA Alliance March) काढण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज इंडिया आघाडीचे तब्बल 300 खासदार एकत्र येत निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढत आहे. मात्र दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या या मोर्चाला परवानगी नाकराली आहे.

दिल्ली पोलिसांकडून निवडणूक आयोगाबाहेर दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान तैनात केले आहे. तर पोलिसांनी मोठी कारवाई करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ताब्यात घेतले आहे.  संविधान वाचवण्यासाठी आमची लढाई सुरु आहे असं यावेळी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत आंदोलन करण्याची परवानगी दिली नसल्याने कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे.

राहुल गांधी पुरावे द्या! शकुन राणीने दोनदा मतदान केलं? निवडणूक आयोगाची मागणी

इंडिया आघाडीच्या या मोर्चादरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांचाही सहभाग असून निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, सत्य देशासमोर आहे. ही लढाई राजकीय नाही. ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. ही लढाई एका व्यक्ती, एका मताची आहे. आम्हाला मतदार यादी हवी आहे. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, संजय राऊत आणि सागरिका घोष यांच्यासह इंडिया आघाडीच्या अनेक खासदारांना ताब्यात घेतले आहे, जे एसआयआरचा निषेध करत होते आणि संसदेपासून भारतीय निवडणूक आयोगाकडे मार्च करत होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube