सरकारने निवडणूक आयोगाचा वापर केला; आमदार जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

सरकारने निवडणूक आयोगाचा वापर केला; आमदार जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

Jitendra Awhad On Election Commission : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. मात्र या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनसह (EVM Machine) VVPAT नसणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) दिली आहे. तर आता जर VVPAT नसणार असेल तर निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन देखील काढून टाकावं आणि पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्यावा अशी मागणी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, VVPAT जर घालवणार असतील तर त्यांनी इव्हीएम पण काढून टाकावं. होऊ द्या बॅलेट पेपरवर मतदान. लोकांची इच्छा आहे बॅलेट पेपरवर मतदान करण्याची. VVPAT हे सुप्रीम कोर्टाने कंपल्सरी केलं होतं, का काढत आहेत? आता लोकांना ईव्हीएमवर शंका आहे, मतदार याद्यांवर शंका आहे, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर शंका निर्माण होते. अशा परिस्थितीत इलेक्शन कमिशनर असं वागत असतील तर संशयास्पद आहे असल्याची टीका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

तसेच यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरुन देखील निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. लोकसभेच्या पराभवानंतर सरकारने निवडणूक आयोगाचा वापर केला. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचं काम केलं ते लांच्छनास्पद आहे. तुमच्याकडे तयारी करायला वेळ आहे, तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्या. असं यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले.

गुंतवणूकदारांना दिलासा, बाजाराने यू-टर्न घेताच 4.50 लाख कोटींची कमाई 

स्थानिक स्वराज्य निवडणुका प्रभाग रचना संशयास्पद : जितेंद्र आव्हाड 

तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये निवडणूक आयोगाने तयार केलेली प्रभाग रचना ही संशयास्पद असल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाण्याच्या प्रभाग रचनेमध्ये जर कळवा, मुंब्रा, दिवा याचा विचार केला तर जागाच कमी केलेल्या आहे. तिथे जागा अधिक द्यायला पाहिजे होत्या. तिथल्या जागा कमी करून त्या ठाणे शहरात देण्यात आल्यात. तिथल्या लोकांवर यांनी अन्याय केला असा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. तर त्याच प्रभाग रचना कायम ठेवण्याचे काम ठाणे महानगरपालिका प्रशासनाने केले. आम्ही निवडणूक आयोगाला पत्र आधीच दिलेल आहे की, प्रभाग रचनेत लक्ष घाला.  समान लोकसंख्या असलेल्या वार्ड पाहिजे असा नियम आहे. असं देखील यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube