मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 11 उमेदवारांची घोषणा

Rajya Sabha Elections : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने तरुण चुघ यांना देखील उमेदवारी दिली आहे.

Rajya Sabha Elections

Rajya Sabha Elections : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने तरुण चुघ यांना देखील उमेदवारी दिली आहे. त्यांना मध्य प्रदेशातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर रजनीश अग्रवाल (Rajnish Agarwal) यांना देखील मध्य प्रदेशातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे राजस्थानमध्ये (Rajasthan) पक्षाने धक्का देत  केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू (Ravneet Singh Bittu) यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागी डॉ. अलका गुर्जर आणि डॉ. सतीश पुनिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षांतर्गत राष्ट्रीय स्तरावर सक्रिय भूमिका बजावणारे तरुण चुघ (Tarun Chugh) यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपची सत्ता असल्याने  या उमेदवारांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे.

भाजपकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशमधून ताई तगक, गुजरातमधून राजुभाई शुक्ला, मुकेशभाई राठवा, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी भाई कंजारिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तर मध्य प्रदेशमधून तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. याचबरोबर मणिपूरमधून ए. शारदा देवी आणि राजस्थानमधून अलका गुर्जर आणि सतीश पुनिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुणे निवडणुकीत नवीन ट्विस्ट?-

follow us