मध्य प्रदेशातील कुख्यात गुंडाशी राम शिंदेंचा घरोबा? रोहित पवारांच्या पोस्टने राज्याच्या राजकारणात खळबळ

मध्य प्रदेशमधील कुख्यात गुंड युवराज काशीदसोबतचे फोटो शेअर करत रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Untitled Design 4

Rohit Pawar’s post creates a stir in state politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. मध्य प्रदेशमधील कुख्यात गुंड युवराज काशीद यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करत रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मध्य प्रदेशमधील कुख्यात गुंड युवराज काशीद याच्याशी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांचा कसा घरोबा आहे, ते या फोटोत बघा. त्यांनी पुढे असा सवाल उपस्थित केला की, गुंड युवराज काशिदच्या पत्नीला स्थानिक निवडणुकीत तिकीट मिळाले नाही म्हणून दिलासा देण्यासाठी राम शिंदे गेले होते का, की पुढील निवडणुकीत नक्की तिकीट मिळेल, असा शब्द ऐकण्यासाठी ही भेट झाली होती?

याच पोस्टमध्ये रोहित पवार यांनी आणखी एक गंभीर दावा केला आहे. पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळातील एका गुंडाळा पासपोर्ट मिळवून देण्यासाठी देखील राम शिंदे यांनी मदत केल्याची जोरदार चर्चा होती, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे सत्ताधारी नेतेच जर अशा प्रवृत्तीच्या लोकांना संरक्षण देत असतील, तर गुंडांमध्ये कायद्याची भीती कशी राहणार, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

माझ्या आमदाराची सही बनावट; टीटीव्ही दिनकरनांचा विजयच्या पक्षावर थेट हल्ला, पोलिसांत तक्रार दाखल

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये सत्ताधाऱ्यांवर ढोंगीपणाचा देखील आरोप केला. हेच गुंड सामान्य जनतेवर अत्याचार करतात आणि नंतर हेच नेते घटनास्थळी जाऊन सांत्वनाचा दिखावा करतात. हे पिव्वर ढोंग नाही का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. तसेच अशा प्रकारच्या राजकीय पाठबळामुळे आपल्या मतदारसंघात देखील गुंडगिरी डोके वर काढत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संवैधानिक पद हे गुंडांना पोसण्यासाठी असतं की कशासाठी, याचं भान जर पदावरील व्यक्तीलाच नसेल तर हे दुर्दैव आहे, अशा शब्दांत रोहित पवार यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. दरम्यान, रोहित पवार यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, यावर राम शिंदे किंवा सत्ताधारी पक्षाकडू काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावर देखील या पोस्टची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून समर्थक आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे.

follow us