दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुणे निवडणुकीत नवीन ट्विस्ट?
Dilip Walse Patil : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. पुण्यातून राष्ट्रवादी
Dilip Walse Patil : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाने देखील उमेदवार दिल्याने कोण बाजी मारणार? याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे आता राज्याचे माजी गृहमंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने या निवडणुकीत नवीन ट्विस्ट येणार का? याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यानंतर पवारांनी आपल्या उमेदवाराला माघार घेण्यास सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे. या निवडणुकीतून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली तर विक्रम काकडे यांचा विजय अधिक सुकर होण्याची शक्यता आहे.
Met with Hon. Sharad Pawar Saheb today at Silver Oak, Mumbai on a range of issues related to:
– Rayat Shikshan Sanstha
– Vasantdada Sugar Institute
– Sugar industry
– Onion prices@PawarSpeaks pic.twitter.com/cVtlIISEGp— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) June 4, 2026
तर दुसरीकडे दिलीप वळसे पाटील यांनी एक्सवर पोस्ट करत या भेटीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ येथे शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान खालील विविध विषयांवर चर्चा झाली:
– रयत शिक्षण संस्था
– वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट
– साखर उद्योग
– कांद्याचे दर
जय पवारांना 10 कोटींचे कर्ज का दिले? विक्रम काकडे नेमकं काय म्हणाले…