6 किलो सोने अन् मुंबई, मनालीमध्ये फ्लॅट, ‘पंगाक्वीन’ कंगनाकडे किती कोटींची मालमत्ता?

6 किलो सोने अन् मुंबई, मनालीमध्ये फ्लॅट, ‘पंगाक्वीन’ कंगनाकडे किती कोटींची मालमत्ता?

Kangana Ranaut Assets : काहींना काही कारणाने सोशल मीडियावर (Social Media) नेहमी चर्चेत राहणारी बॉलीवूडची (bollywood) लोकप्रिय अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election) रिंगणात उतरली आहे. कंगनाला भाजपकडून (BJP) हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून (Mandi Lok Sabha) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

आज कंगनाने मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना तिने प्रतिज्ञापत्रात आपल्या एकूण संपत्तीबद्दल माहिती दिली आहे. सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कंगनाकडे 91 कोटी 66 लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यापैकी जंगम मालमत्ता 28.73 कोटी रुपये तर स्थावर मालमत्ता 62.92 कोटी रुपये आहे. तर 17.38 कोटी रुपयांचे कर्ज कंगनावर आहे. अशी माहिती कंगनाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.

याच बरोबर कंगनाकडे दोन मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यूसह चार कार आहेत. त्यामध्ये 3.91 कोटी आणि 58.65 लाख रुपयांच्या मर्सिडीज कार आणि 98.25 लाख रुपयांच्या बीबीएमडब्ल्यू कराचा समावेश आहे. तर कंगनाकडे तब्बल 8 बँक खाती असून 50 एलआयसी पॉलिसी आहे. प्रतिज्ञापत्रानुसार कंगनाने शेअर बाजारात देखील मोठी गुंतणवूक केली आहे. तिने शेअर बाजारात 1 कोटी 21 लाख रुपयांची गुंतणवूक केली आहे. कंगनाने चित्रपट कंपन्यांसह 11 जणांना वैयक्तिक कर्जही दिले आहे.

प्रतिज्ञापत्रानुसार कंगनाकडे 6 किलो सोन्याचे दागिने आहेत, ज्याची किंमत 5 कोटीच्या आसपास आहे तर 60 किलो चांदी आहे. त्याची किंमत 50 लाख आहे. कंगनाकडे 3 कोटी रुपयांचे हिरेही आहेत. तर तिच्याकडे 2 लाख रुपयांची रोकड आहे. याच बरोबर जिरकपूर, चंदीगड, मनाली आणि वांद्रे येथे एक अपार्टमेंट आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा ? ‘या’ महिन्यात होणार सुनावणी

प्रतिज्ञापत्रानुसार वांद्रे येथील अपार्टमेंटची किंमत 23.98  कोटी रुपये आहे तर मनाली अपार्टमेंटची किंमत 4.97 कोटी रुपये आहे. याशिवाय मुंबईत अनेक निवासी इमारती आहेत. तर मुंबईमधील दोन पोलीस ठाण्यात कंगनाविरुद्ध मानहानीच्या आणि एक कॉपीराइट आणि धार्मिक भावना भडकावण्याशी संबंधित तीन गुन्हे दाखल आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज