विधानपरिषदेचं चित्र स्पष्ट! 17 पैकी 5 जागा बिनविरोध तर 12 ठिकाणी महायुती-मविआमध्ये लढत

Legislative Councils निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामध्ये 17 पैकी 5 जागा बिनविरोध तर 12 ठिकाणी महायुती-मविआमध्ये लढत होणार आहे.

Legislative Councils

Legislative Councils picture clear 5 unopposed, 12 seats are contested between Mahayuti-MVA : राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असताना राज्यामध्ये राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. त्यानंतर अखेर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामध्ये 17 पैकी 5 जागा बिनविरोध तर 12 ठिकाणी महायुती-मविआमध्ये लढत होणार आहे.

कोण-कोणत्या जागा झाल्या बिनविरोध?

ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रविंद्र फटक यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार आणि नगरसेवक असलेले अभिजित पवार यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे फाटक यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

यवतमाळमध्ये देखील असंच घडलं आहे. या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार यांनी काल बुधवारीच माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्यानंतर आज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन अपक्षांनी माघार घेतल्याने यवतमाळमध्ये देखील शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

Ahilyanagar MLC Election : प्राजक्त तनपुरे बिनविरोध, पण माघारीवरून हाय व्होल्टेज ड्रामा ! दत्तात्रय पानसरेंचा कलेक्टर ऑफिसमध्ये ठिय्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांचे उमेदवार आणि पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. याआधी भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली होती. त्यामुळे निवडणुकीतील सर्व प्रमुख आव्हाने दूर झाल्याने विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

देऊळ बंद 2 नंतर प्रविण तरडेंची मोठी घोषणा! लवकरच येणार मुळशी पॅटर्न 2

अहिल्यानगर विधानपरिषदेच्या निवडणुकीतून अपक्ष उमेदवार करण ससाणे, कमलेश गांधी आणि दत्ता पानसरे यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र पानसरे यांनी त्यांच्या प्रतिनिधीने उमेदवारी अर्ज माघार घेतला आहे. त्याला पानसरे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार गोंधळ उडाला आहे.

या ठिकाणी महायुती-मविआमध्ये लढत

छत्रपती संभाजीनगर-जालना, जळगाव, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नांदेड, सोलापूर, नागपूर, सांगली-सातारा, नाशिक,

 

follow us