संग्राम जगताप ठरले किंगमेकर! पानसरेंच्या माघारीमुळे तनपुरे विधानपरिषदेवर बिनविरोध
MLC Election Sangram Jagtap यांच्या समन्वयाने उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात दत्ता पानसरे यांनी अर्ज मागे घेतला
MLC Election Ahilynagar Sangram Jagtap kingmaker Pansare’s withdrawal, Tanpure unopposed : विधानपरिषद निवडणुक जागा बिनविरोध करून दाखवत भारतीय जनता पक्षा सह महायुतीने राजकीय पातळीवर महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अपेक्षेप्रमाणे भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे हे बिनविरोध निवडून आले असून, या घडामोडीमुळे जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद आणि राजकीय प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
संग्राम जगताप ठरले किंगमेकर
विशेष म्हणजे या संपूर्ण राजकीय घडामोडीत आमदार संग्राम जगताप यांच्या समन्वयाचीही मोठी चर्चा रंगली. उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात दत्तात्रेय पानसरे यांनी अर्ज बळजबरीने किंवा खोट्या सहीने मागे घेतल्याचा आरोप केल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नाट्यमय घडामोडीनंतर अखेर तनपुरे बिनविरोध; विखे-जगतापांच्या समजुतीनंतर पानसरेंची माघार
मात्र त्यानंतर आमदार संग्राम जगताप आणि दत्तात्रेय पानसरे यांच्यात बंद दाराआड सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर दोघेही एकाच वाहनातून बाहेर पडल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. अखेर पानसरे यांची समजूत काढण्यात यश आले आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडत माघारीची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. या संपूर्ण प्रक्रियेत आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच शेवटच्या क्षणी निर्माण झालेला पेच सुटल्याची चर्चा सुरू आहे.