महायुतीत वादाची ठिणगी! लोकांच्या पालख्या आम्ही का वाहायच्या? भाजपचा रोख कोणावर?
अहमदनगर – लोकसभेनंतर आता विधानसभेचं वेध लागले आहे. मात्र, नगर जिल्ह्यात महायुतीला तडे जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. कारण, नगरच्या जागेवर पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) तिकीट देण्याची भाजपकडून होत आहे. मात्र, सद्यस्थितील नगरमध्ये अजित पवार गटाचे संग्राम जगताप (Sangram Jagtap) हे विद्यमान आमदार आहेत. अशातच, मुंडेंना तिकीट देण्याची होऊ लागल्यानं महायुतीत कुरघोड्या सुरू झाल्याचं चित्र आहे.
दरम्यान, आम्ही केलेली मागणी काही गैर नाही. आम्ही लोकांच्या पालख्या का वाहायच्या? असं सूचक विधान भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केलं.
निकाल लागून अवघे दोन दिवस झाल्यानंतर आगरकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत पत्र पाठवून पंकजा मुंडेंना या ठिकाणी विधानसभेची उमदेवारी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, युती असतांना नगर शहरातून शिवसेना उमेदवारला अन् आता महायुती उमेदवारांना मताधिक्य मिळत आलेलं आहे. नगर शहरातील भाजप संघटनेमुळे आजवर हे यश मिळत आलं. युतीत असताना राठोड यांना देखील सातत्याने पंचवीस वर्षे आमदार म्हणून निवडून आणलं. त्यावेळेस भाजपाने युतीधर्म पाळत त्यांना मोठी साथ दिली होती, असं आगरकर म्हणाले.
NDA सरकारमध्ये महाराष्ट्राचे किती मंत्री? अजितदादांच्या राष्ट्रवादीला लॉटरी; पाहा यादी
पुढे बोलताना आगरकर म्हणाले की, अवघ्या थोड्या फरकाने मुंडे यांना पराभवाला सामोरे सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीमध्ये नैराश्य हे येत असतं. लोकसभा निडणुकीमध्ये विखे यांनाही नगर शहरातून चांगलं मताधिक्य मिळालं. त्यात भाजपचा महत्त्वाचा वाटा आह. नगर शहरात भाजपाला एक सकारात्मक आणि अनुकूल असे वातावरण आहे. त्यामुळं आम्ही बावनकुळे यांच्याकडे पंकजा मुंडे यांना नगरमधून उमेदवारी देण्याची मागणी केली. लोकांच्या पालख्या वाहण्यापेक्षा आपला माणूस का नको? असा सवालही यावेळी आगरकर यांनी उपस्थित केला.
एआय इंजिनिअरींग सर्व्हिसेस लिमिडेटमध्ये मेगा भरती सुरू, महिन्याला 27,940 रुपये पगार
ते म्हणाले की, उमेदवारीची मागणी करण्यात काही गैर नाही. युती आणि महायुती धर्म पाळत भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच उमेदवार कोणी असो त्यांना साथ दिली आहे. त्यामुळे आता किती दिवस इतरांच्या पालख्या व्हायच्या. आम्ही वरिष्ठकडे मुंडेंना तिकीट देण्याची मागणी केली. मात्र पक्षाकडून जो आदेश येईल, तोच आदेश आमच्यासाठी अंतिम असणार आहे.
गोपीनाथ मुंडे यांचे नगरवरती प्रेम
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे नगर जिल्हावर नेहमीच प्रेम राहिले आहे. नगरकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंडे हे नेहमी अग्रस्थानी असायचे. नगरमधील जी गुंडगिरी होती, ती देखील ठेचून काढण्याचे काम मुंडे यांनी केले आहे.