‘मत दिलं नाहीतर पंकजा मुंडेंना साताऱ्यातून निवडून आणेन’ बीडकरांसमोर उदयनराजे भोसलेंची मोठी घोषणा

‘मत दिलं नाहीतर पंकजा मुंडेंना साताऱ्यातून निवडून आणेन’ बीडकरांसमोर उदयनराजे भोसलेंची मोठी घोषणा

Udayanraje Bhosale:  भाजप नेते आणि सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेत एक मोठी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

जाहीर सभेत बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, जर तुम्ही पंकजा मुंडेंना मतदान केलं नाहीतर मी राजीनामा देईल आणि तिला निवडून दिलं असं वक्तव्य करत त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Lok Sabha) पंकजा मुडेंना निवडून द्या असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केला.

पुढे उदयनराजे भोसले म्हणाले, मी मनापासून सांगतो जर तुम्ही पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही,तिला जर तुम्ही निवडून दिलं नाही, तर मी राजीनामा देईल आणि पंकजाला माझ्या तिथून निवडून आणेन हे लक्षात ठेवा. पण तसं होत नाही. मी येतांना बघत होतो, चोहोबाजूंनी कंपाऊंडला कुलूप लावतो. हो म्हणालात तर सोडतो. नाहीतर नाही सोडत. असं देखील उदयनराजे भोसले म्हणाले.

तर एका जीवाभावाच्या व्यक्तीला मदत करायची की नाही. तिला संधी मिळाली पाहिजे की नाही? ती काळ्याची पांढरी झाल्यानंतर तिला संधी मिळणार का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला. मी कुणाचे कौतुक करायला आलो नाही, ते  महाराजांचे नाव घेऊन ते विकास करत आहेत. गरिबी हटाव म्हणून काम करत आहेत.

मी एक सांगतो कृपा करा आई माझ्या बहिणीला निवडनू द्या. मी इकडे हिच्याकरता आलो. तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय. असे त्यांनी यावेळी सांगितले. या सभेत भावुक होत त्यांनी तुम्ही पंकजाला निवडून देणार ना? असा सवाल देखील लोकांना विचारला.

गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला पाठवले मुलींचे 1000 पेक्षा जास्त व्हिडिओ, पुण्यात एमएमएस स्कँडल

तुम्ही तिला निवडून देणार का? नाहीतर मी माझ्या जाग्यावर तिला निवडून आणतो आणि मग तुमच्याकडे बघतो, असा दम देखील त्यांनी यावेळी बीडकरांना दिला. चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी आज शेवटचा दिवस होता. बीडसह राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज