गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला पाठवले मुलींचे 1000 पेक्षा जास्त व्हिडिओ, पुण्यात एमएमएस स्कँडल

गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला पाठवले मुलींचे 1000 पेक्षा जास्त व्हिडिओ, पुण्यात एमएमएस स्कँडल

Pune MMS Scandal : ऐन निवडणुकीच्या काळात देशात कर्नाटकमध्ये प्रज्वल रेवण्णा एमएमएस स्कँडल (Prajwal Revanna MMS Scandal) प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आतापर्यंत या प्रकरणात ठोस कारवाई झाली नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर आता दुसरीकडे संपूर्ण देशातल्या टॉप कॉलेजेसपैकी एक असणाऱ्या पुण्यातील COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये (COEP Technological University) असाच एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. या कॉलेजमध्ये एमएमएस स्कँडलसमोर आल्याने पुण्यात शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

माहितीनुसार, 5 मे रोजी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थिनी सोशल मीडियावर (Social Media) ट्विट करत या धक्कादायक प्रकरणाबद्दल खुलासा केला. तसेच, कॉलेज प्रशासनने याबाबत पोलिसांमध्ये तक्रारपण केली नसल्याचा आरोप या ट्विटमध्ये करण्यात आला होता. यानंतर 8 मे रोजी 2 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र मुलींनी हॉस्टेल प्रशासनाकडे 3 मे रोजी या प्रकरणाबाबत तक्रार केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचे चोरून व्हिडिओ शूट करीत होती आणि त्यानंतर हे व्हिडिओ ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या बॉयफ्रेंडला पाठवत होती. आरोपी मुलीवर तिच्यासोबत राहणाऱ्या रूम मेट्सला संशय होता. यामुळे 1 मे रोजी त्यांनी आरोपी मुलीचा लॅपटॉप तपासला. लॅपटॉपमध्ये त्यांना हॉस्टेलमधील अनेक मुलींचे खासगी हजार पेक्षा जास्त व्हिडिओ आणि 300 पेक्षा जास्त फोटो पाहून धक्का बसला. आरोपी मुलीला जाब विचारला असता तिच्याकडून उडवा उडवीचे उत्तर देण्यात आले. यानंतर मुलींनी या प्रकरणाची माहिती हॉस्टेल प्रशासनाला दिली.

मात्र हॉस्टेल प्रशासनाकडून हा प्रकरण गंभीर नसून तुम्ही गप्प बसा असं मुलींना सांगण्यात आल्याचा आरोप मुलींकडून करण्यात येत आहे. हॉस्टेल प्रशासनाकडून या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नसल्याने 3 मे रोजी या प्रकरणाची तक्रार कॉलेज प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र कॉलेज प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. यामुळे हॉस्टेलमधील एका मुलीने 5 मे रोजी सोशल मीडियावर या प्रकरणाचा खुलासा केला. त्यानंतर कॉलेज प्रशासनाकडून 8 मे रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

राज ठाकरे पुन्हा चर्चेत, भर सभेत म्हणाले, मी आज फतवा काढतो अन् …

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलीकडून हे व्हिडिओ बॉयफ्रेंड विनीत सुराणा याला पाठवण्यात येत होते, सुराणा या व्हिडिओंचा चुकीचा वापर करीत होता अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. मात्र या धक्कादायक घटनेनंतर देखील कॉलेज प्रशासनाकडून कोणतीही कारवाई का ? करण्यात आली नाही असा प्रश्न विचारला जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज